काळे, कोल्हे, परजणे, औताडेंची सहमती एक्स्प्रेस ठरली शेतकऱ्यांच्या हिताची
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतीने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट कार्यप्रणाली राबवून एकाच छताखाली एकाचवेळी अनेक सुविधा पुरवत पारदर्शक कामकाज करुन राज्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. याचीच दखल महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने घेत कोपरगाव बाजार समितीला नाशिक विभागाचा सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. गेल्या ७० वर्षात प्रथमच कोपरगाव बाजार समितीला हा मनाचा पुरस्कार मिळाल्याने आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या कार्याचे सर्वञ कौतूक होत आहे.

पुरस्कार वितरण सोहळयात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष सुर्यवंशी, संचालक अॅडव्होकेट सुधीर कोठारी. मानकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार कोपरगांव बाजार समितीला प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारते वेळी कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक साहेबराव लामखडे, खंडु फेपाळे, रामदास केकाण, प्रकाश गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, लक्ष्मण शिंदे, संजय शिंदे, शिवाजी देवकर, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोक नवले, रामचद्र साळुंके, मिरा कदम, माधुरी डांगे, यांच्यासह सचिव नानासाहेव रणशुर आदींची उपस्थिती होती.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीने गेल्या चार वर्षांपासून बाजार समितीच्या विविध कामात अमुलाग्र बदल केला आहे. दर वर्षी अद्यावत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी व व्यापाऱ्यांना सुविधा देत नवी क्रांती करीत आहे. आमदार आशुतोष काळे , संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्यावतीने सलग ४ वर्षे लेखा परिक्षण व इतर कामकाजात अ दर्जा मिळाला आहे.

बाजार समितीत शेतमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकल्या बरोबर त्यांच्या मोबाईलवर सर्व हिशोब दिला जातो तसेच व्यापाऱ्यांकडून त्वरीत पेमेंट देण्याची सुविधा बाजार समितीने एकाच छताखाली उभी केल्याने बाजार समितीचा कार्याची महती सर्वदूर झाली आहे. पारदर्शक कारभार सुरु असल्याने शेतमालाची आवक वाढली. पर्यायाने बाजार समितीचे उत्पन्न दरवर्षी वाढत गेले. आजपर्यंतच्या इतिहास प्रथमच ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल करीत

विक्रमी ५ कोटी १० लाखांचा निव्वळ नफा मागच्या अर्थीक वर्षात बाजार समितीला झाला.अनेक विकास कामे करुन बाजार समितीने सुविधा पुरवल्यामुळे नाशिक विभागाच्या अहिल्या नगर,नाशिक, धुळे, जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील बाजार समित्यापैकी कोपरगाव बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या बाजार समित्यांना मा. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळयात नाशिक विभागातून कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत तिस-या क्रमांकाचा मानाचा हा पुरस्कार मिळवून इतिहास रचला आहे. अशी माहीती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी दिली. मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने कोपरगाव बाजार समितीचे नाव राज्यात कौतुकास्पद झाले आहे. आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे , युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या सहमती एक्सप्रेसने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे हे फलीत आहे असेही ते म्हणाले.

या पुरस्कारा बद्दल अधिक माहिती देताना सचिव नानासाहेब रणशुर म्हणाले की, तालुक्यातील सर्व नेत्यांचे मार्गदर्शन, सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी यांच्या सहकार्याने कोपरगाव बाजार समितीच्या उत्कृष्ट कार्याचा आलेख उंचावण्याचे काम सुरु आह. पारदर्शक कारभार, शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, सलग अ वर्ग, भरीव वाढावा, शेतक-यांना रोख पेमेंट, काँक्रीटीकरण, जनावरे, भाजीपाला, उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतक-यांच्या हिताला प्राधान्य देणा-या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट व पारदर्शक करीत असल्याने मागील तीन वर्षात अनेक उपक्रमाव्दारे बाजार समितीत आदर्श कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने पारदर्शक कामकाज करून वेगळेपण सिद्ध केले. कोपरगाव बाजार समितीला तिस-या क्रमांकांचा हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे. या यशाबद्दल सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सचिव नानासाहेब रणशुर यांनी व सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी, खरेदीदार व्यापारी, हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी अनमोल सहकार्य करुन एक जीवाने सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असुन या पुरस्काराने बाजार समितीच्या कार्याला नवी उर्जा मिळाली आहे.

यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी ततार व अधिक उपयुक्त व नावीण्यपुर्ण उपक्रम राबवून सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार बाजार समितीच्यावतीने व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक पुरस्काराबद्दल सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, बाजार समितीचे सचिव, कामगार, शेतकरी व्यापारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
