गौतम पॉलीटेक्निकमध्ये व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य विषयावर व्याख्यान संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य’ या विषयावर प्रा.वैभव जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा. वैभव जाधव यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा व संवाद कौशल्य याचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच संवाद कौशल्या मधून स्वतःचा विकास कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. 

महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती, शैक्षणिक निरीक्षक प्रा. नारायण बारे  तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली निंबाळकर यांनी केले तर प्रा.गौरव जोशी यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply