कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील मुळ रहिवासी असलेला विनोद शिवाजी पाटोळे वय ३४ वर्ष याचा कोपरगाव दुय्यम कारागृहात चक्कर येवून मृत्यू झाला. या घटनेची पोलीस व कारागृह प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहीती अशी की,

गेल्या सहा दिवसांपूर्वी अर्थात ३० सप्टेंबर रोजी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात सुभाषनगर येथील विनोद शिवाजी पाटोळे याला कोपरगाव शहर पोलीसांनी नुकतेच अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

कोपरगाव तहसील येथील दुय्यम कारागृहातील बराक नं ५ मध्ये १४ कैद्यांसमवेत ठेवण्यात आले होते. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार आरोपी विनोद पाटोळे ह्याला दारूचे व्यसन होते. कारागृहात आल्यामुळे दारु पिणं बंद झाले होते. शरीराला दारु न मिळाल्याने त्यांचे अंग थरथरत होते अशातच त्याला दोन दिवसांपूर्वी चक्कर येत असल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून कारागृहात सोडले.

माञ पुन्हा सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली आणि तो बराक नं ५ मध्ये चक्कर येऊन पडल्याची माहीती सुरक्षेवर हजर असलेल्या तेथील पोलीसांना कळताच त्यांनी रिक्षा मध्ये टाकुण उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिरीष गुट्टे यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. त्याचा निश्चितच मृत्यु कशामुळे झाला याचे निश्चित कारण शवविच्छेदन केल्यानंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मयत पाटोळे यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपात त्याला गजाआड केले होते. चक्कर येवून कारागृहात कैदी मृत्यूमुखी पडल्याने पोलीस व कारागृह प्रशासनाची धांदल उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत
