शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : शेवगाव शहराला होणारा अनियमित नळ पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी वसुधा सावरकर, राजश्री रसाळ व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी (दि ८) शेवगाव नगरपरिषदेच्या कार्यालयावर महीलांनी हंडा मोर्चा काढला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, धरण उशाला कोरड घशाला, निष्काळजी नगरपरीषद प्रशासनाचा धिक्कार असो. स्वच्छ व वेळेवर पाणी पुरवठा झालाच पाहीजे अशा विविध प्रकारच्या प्रचंड घोषणा बाजी करत नगरपरिषदेचा निषेध करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या प्रशासनात राष्ट्रवादी कांग्रेस व भाजपा या दोनही पक्षानी देखील सत्ता उपभोगली असुन सत्तेत असतांना दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांच्या तोंडाला मुसकी होती का? आत्ताची त्यांची पाणी प्रश्नावरील आंदोलने व जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका हा केवळ त्यांना फुटलेला पुतना मावशीचा पान्हा आहे. लोकशाहीत आपले म्हणणे मांडणे त्यासाठी आंदोलन करणे हा घटनात्मक हक्क असला तरी शेवगावच्या पाण्यासंदर्भात आंदोलन करण्याचा दोन्ही पक्षानी आपला नैतीक अधिकार गमावला आहे.
गणेश रांधवणे
मनसे तालुकाध्यक्ष
यावेळी सविता भुजबळ, रुपाली तडवळकर, भाविका आर्य, शैला बडधे, बेबीताई मरकड, ज्योती नांगरे, अनिता गुणवंत, गिता नांगरे, मनिषा मरकड, योगिणी पाटील, अंजली भुजबळ, अर्चना जाजू, सीमा बोरूडे, विद्या राजे, संगीत रायकर, अनुराधा क्षिरसागर, अनिता शिंदे, चंद्रप्रभा कांबळे, उमा मानधने, पद्मा भड़के, मनिषा गवळी, सुचित्रा देशपांडे, सुवर्णा दहिवाळकर, रेखा शिंदे, अलका नांगरे, रेखा गवळी, उषा कुलकर्णी, शोभा शिनगारे, द्वारका शिंदे, अर्चना काथवटे, मंगल देसाई, उमा देहाडराय, रूक्मिणी जाधव, वैशाली पन्हाळे, मिना पलोड, रेखा भंडारी, सोनल शेळके, उज्वला डोम, सुर्यकला ढाकणे, प्रमिला काळे, राजश्री बडे आदी महिलांनी महिलांच्या पाण्याबाबतच्या व्यथा तीव्र शब्दात नगरपरिषद प्रशासनासमोर मांडल्या.
दहा ते पंधरा दिवसांनी नळाला थोडा वेळ पाणी सुटते. सर्वसामान्य कुंटूंबाकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्या, बकेट, भांड्यांमध्ये असेल लहान मोठ्या भांड्यात पाणी साठवून ठेवतात. साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळ्या होत असून नागरिकांना डेंग्यूची बाधा हाेत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणा-या वितरण व्यवस्थेत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान ३-४ दिवसातून तरी पाणी पुरवठा होईल याबाबत तातडीने पावले उचलली जावीत. धरणातून मुबलक पाणी मिळत असुन देखील ही परिस्थिती का निर्माण होत आहे, याचा सखोल अभ्यास नगरपरिषदेच्या प्रशासनाने करणे आवश्यक असुन नविन पाणी पुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
टक्केवारीच्या व मलिद्याच्या खेळात सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये. अशी टीका करण्यात आली. सामान्य शेवगावकर अंत्यत सहनशील असुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहु नये. धरण उशाला असुनही १५ दिवसाला पाणी पुरवठा होणारे हे देशातील पहीलेच शहर असावे. तरी येत्या आठ दिवसात या परिस्थितीत आपण तातडीने सुधारणा न केल्यास शहरातील महिला भगिनींच्या नेतृत्वाखाली पुन्हा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिपक कोल्हे, सोनाली वारे, पाणी पुरवठा विभागाचे शरद लांडे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी संजय बोरुडे, महेश आर्य, मंगेश लोंढे, गणेश डोमकावळे, अजिंक्य अधांरे, अविनाश गवते, प्रसाद लिंगे, बाळासाहेब डाके, संदिप गवळी, बाळा वाघ, निवृती आधाट, जनार्दन रायकर, ज्ञानेश्वर कुसळकर, संदिप गवळी,प्रतिक रांधवणे उपस्थित होते.