शेवगाव प्रतिनिधी, दि.८ : शेवगांव, पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर २०२३ मध्ये रु. ४३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीच्या कामांना मंजूरी मिळाली असुन या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. दोन्ही तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचा या मंजूर कामामध्ये सामावेश असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
याबाबत आ . राजळे यांच्याकडून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या मंजूर कामांमध्ये शेवगांव तालुक्यातील आखतवाडे ते राशिनकर वस्ती रस्ता ग्रामा-208 खडीकरण डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, अमरापुर ते वरुर रस्ता इजिमा-246 खडीकरण डांबरीकरण करणे रु. 60 लक्ष, वाघोली ते जवखेडे रस्ता इजिमा-190 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष, वडूले खुर्द ते चव्हाणवाडी रस्ता ग्रामा-77 कि.मी. 0/0 ते 3/500 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 150 लक्ष, थाटे ते शिंगोरी रस्ता इजिमा-85 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 150 लक्ष, प्रभुवाडगांव ते नागरे वस्ती रस्ता ग्रामा- 165 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष, जुन्नी खामपिंप्री (दत्त पाटी) ते खडका मडका रस्ता इजिमा – 83 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष,
रामा-50 ते माळेगांव ने रस्ता ग्रामा-22 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 120 लक्ष, बोधेगांव – एकबुर्जी – पहिलवान्न वस्ती ते काळोबा वस्ती खडीकरण व डांबरीकरणासह पुलाचे काम रु. 100 लक्ष, घोटण ते मोटकर वस्ती रस्ता ग्रामा-189 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष, दत्त पाटी ते मळेगांव रस्ता ग्रामा-111 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष, मुंगी ते कोळीवस्ती प्रजिमा 222 रस्ता कि मी 10/00 ते 13/600 मधील उर्वरीत लांबीची सुधारणा करणे रु. 300 लक्ष, ढबाणवस्ती ते मुंगी रस्ता प्रजिमा 222 कि मी 8/00 ते 10/00 मधे मधील खराब लांबीची सुधारणा करणे रु. 300 लक्ष, रामा 50 ते बाभळगाव गदेवाडी मुंगी रस्ता प्रजिमा 40 किमी 0/00 ते 2/00 व 12/00 ते 15/00 मधील खराब लांबीची सुधारणा करणे रु. 250 लक्ष, चापडगाव कांबी रस्ता प्रजिमा30 किमी 93/00 ते101/00 मधील उर्वरीत खराब लांबीची सुधारणा करणे रु. 100 लक्ष .
तर पाथर्डी तालुक्यातील खरडगांव-सुसरे रस्त्यावरील सुसरे येथे नांदणी नदीवर मोठया पुलाचे बांधकामासह जोड रस्त्याचे काम रू. 362 लक्ष, जांभळी फाटा ते जांभळी प्रजिमा -165 कि.मी. 14/500 ते 16/00 मध्ये सुधारणा करणे रु. 150 लक्ष, भिलवडे फाटा ते भिलवडे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. 90 लक्ष, सोमठाणे खरडगांव रस्ता ग्रामा-81 खडीकरण डांबरीकरण करणे रु. 60 लक्ष, वरुर ते सोमठाणे रस्ता ग्रामा-130 (सोमठाणे हद्दीत) खडीकरण डांबरीकरण करणे रु. 60 लक्ष, प्रजिमा 39 ते औरंगपुर रस्ता 174, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, औरंगपुर ते हनुमान वस्ती रस्ता ग्रामा-7, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, अकोला ते शेकटे रस्ता ग्रामा-30 (केदार-माने-नागरगोजे वस्ती) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, अकोला-धायतडकवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. 1.5 कि.मी. रु. 40 लक्ष,
एकनाथवाडी-जांभळवाडी रस्ता ग्रामा-55 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. 60 लक्ष, कासारपिंपळगांव ते पारेवाडी ग्रामा-12 कि.मी. 1/0 ते 3/0 मधील खराब लांबीची सुधारणा करणे रु. 50 लक्ष, हत्राळ ते पाडळी रस्ता इजिमा-346 मधील खराब लांबीची दुरुस्ती करणे रु. 100 लक्ष, हत्राळ ते डांगेवाडी रस्ता इजिमा-254 वर पुलाचे बांधकाम करणे रु. 80 लक्ष, राममा-752 ई ते कासाळवाडी रस्ता ग्रामा-39 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 100 लक्ष, खेर्डे ते सांगवी (लोखंडवाडी मार्गे) रस्ता ग्रामा-46 खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 120 लक्ष, राममा 61 ते अकोला – जांभळी – खरवंडी प्रजिमा-2 कि.मी. 15/00 ते 18/900 मध्ये सुधारणा करणे रु. 300 लक्ष,
कोरडगांव – बोधेगांव रस्ता प्रजिमा-39 किे.मी. 5/00 मध्ये लहान पुल बांधणे रु. 100 लक्ष, आखेगांव – कोरडगांव रस्ता प्रजिमा-38 कि.मी. 12/300 ते 18/000 मध्ये सुधारणा करणे व कोरडगांवात काँक्रीट गटार बांधणे रु. 300 लक्ष, चिंचपुर इजदे -पिंपळगांव -जोगेवाडी प्रजिमा – 47 किमी 9/600 मध्ये पुलाचे बांधकाम करणे रु. 200 लक्ष किंमतीच्या कामांना मंजूरी मिळालेली आहे. या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांना एवढया मोठया प्रमाणात निधी दिल्यामुळे आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
शेवगांव शहर बाहयवळण रस्त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिका·यांसमवेत बैठक घेवुन कामाचे सर्वेक्षण भूसंपापदन प्रस्ताव तयार करणे, तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी रु.६० लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच शेवगांव बाहयवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. राजळे यांनी म्हटले आहे.