जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोपरगावला संधीच नाही

 अनुसूचित जाती व जमातीचा आरक्षणामुळे पत्ता कट

‌कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला किंवा दुसऱ्या फळीतील राजकीय कार्यकर्त्यांना अहिल्यानगर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळेल असे स्वप्न बाळगून राजकीय वाटचाल सुरु होती तशी मोर्चेबांधणी करण्यात आली होती.  मिनी मंञालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय नशिब आजमावण्याची संधी मिळेल असे गेल्या अनेक वर्षांपासून वाट होते. माञ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीच्या महीलेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोपरगावसह जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेत्यांचा हिरमोड झाला.

आदिवासी समाजातील उमेदवाराला अर्थात अनुसूचित जमातीच्या त्यातही महीलेला आरक्षण निश्चित झाल्यामुळे राजकारणातील पुरुषांचे स्वप्न  हे स्वप्नच राहीले आहे. अशातच किमान कोपरगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या एखाद्या महीलेला निवडून आणुन अध्यक्ष पदाच्या शर्यतीत तरी उतरवता येईल अशी आशा असलेल्यांची गटाच्या आरक्षणातुन तिही संधी हुकली आहे. कोपरगाव तालुक्यातील ५ गटाचे आरक्षण जाहीर झाले असुन त्यात अनुसूचित जमातीच्या महीलेला व पुरुषाला जागा आरक्षित नाही.

इतकंच काय तर अनुसूचित जातीसाठी सुध्दा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण नसल्यामुळे तालुक्यातील आदिवासीसह अनुसूचित जातीला  जिल्हा परिषदेचे सदस्य सुध्दा होता येणार नाही. केवळ आरक्षणामुळे तालुक्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या कार्यकर्त्यांची  संधी हुकली आहे.

सुदैवाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी तब्बल तीन जागा आरक्षित आहे त्यात संवत्सर व ब्राम्हणगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने तो सर्वांसाठी खुला झाला आहे येथे कोल्हे, परजणेसह इतरांसाठी अनुकूल आहे माञ त्यांना अध्यक्षपदाची संधी यावेळी तरी मिळणार नाही. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांचा बालेकिल्ला असलेल्या पोहेगाव गटात सर्वसाधारण महीलेसाठी आरक्षित असल्याने तिथे महीलेला संधी आहे. 

 सुरेगाव , शिंगणापूर हे  गट नागरीकांचा  मागास प्रवर्ग महीलांसाठी आरक्षित असल्याने अनेकांची इच्छा असुनही घरातील महीलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागेल. दरम्यान गेल्या पंचवार्षिक मध्ये निवडून आलेल्या पैकी, शिंगणापूर गटातील राजेश परजणे व पोहेगाव गटातील सोनाली रोहमारे यांचे गट त्यांच्यासाठी आरक्षणामुळे सुरक्षित राहील्याने त्यांना पुन्हा संधी आहे. माञ अनेक वर्षे जिल्हापरिषदेच्या राजकारणात आपला कार्याचा ठसा उमटवणारे राजेश परजणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद यावेळी तरी भेटेल अशी आशा कोपरगावकरांना होती माञ आरक्षणामुळे त्यांची संधी यावेळी ही गेली आहे. 

तालुक्यातील दिग्गज नेते कोणती रणनिती आखतात यावर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शिवाय नेत्यांनी दिलेले उमेदवार मतदारांनी किती भावतात यावर तालुक्याचे राजकीय चिञ  स्पष्ट होईल. पण काहीही झाले तरी या आरक्षणामुळे भल्याभल्याची संधी हुकली आहे. पंचायत समिती सभापतीसह जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदावरुन होणारे राजकारण सध्या तरी कोपरगावमध्ये  होणार नाही.

‌कोपरगाप पंचायत सदस्य संख्या १० व जिल्हा परिषद सदस्य संख्या ५ असे १५ पैकी सभापती पद महीलांसाठी आरक्षित असल्याने तब्बल ९ महिलांना संधी आहे. त्यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात  महीलांच वर्चस्व राहणार आहे.

 कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे मगाच्यावेळी निवडून आलेले  सदस्य  व आरक्षण गट निहाय पुढील प्रमाणे –   १) शिंगणापूर गट – ( सर्वसाधारण – सदस्य  राजेश परजणे होते ), २) ब्राम्हणगाव  गट ( सर्वसाधारण महीला – सदस्य विमल आगवण ) ३) सुरेगाव गट  – ( सुधाकर दंडवते)  ४) संवत्सर गट ( अनुसूचित जाती – सदस्य सोनाली साबळे)   ५) पोहेगाव  गट – ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला -सदस्य सोनाली रोहमारे) 

Leave a Reply