शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : शनिवार दि. ६ रोजी शेवगाव सायकल क्लबच्या सदस्यानी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्लब द्वारा आयोजित पंढरपूर वारीचे प्रस्थान झाले. शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी वारीला हिरवा झेंडा दाखविला.
“देखणा है कल, तो सायकल चलाओ”, “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा” अशा घोषणा देत अत्यंत उत्सहात शेवगाव सायकल क्लबच्या सर्व सदस्यांनी पहाटेच्या रम्य वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रयाण केले. एकाच दिवसात टेम्भूर्णी मुक्काम करून रविवारी ७ जुलै रोजी पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन, नगर प्रदक्षिणा सह भव्य सायकल रिंगण सोहळा होऊन वारीची सांगता होणार आहे.
शेवगाव सायकल क्लबच्या वतीने आयोजित पंढरपूर सायकल वारीचे हे तीसरे वर्ष असून या वारी मध्ये वय वर्ष १३ ते ६५ वयो गटातील ज्येष्ठ सदस्य डॉक्टर्, शिक्षक, सरकारी कर्मचारी, केमिस्ट, अशा विविध व्यवसायिकासह विविध क्षेत्रातील मान्यवर या वारीत एकूण तीन महिलासह ४२ जण सहभागी झाले आहेत.
यापूर्वीही या क्लब ने नर्मदा परिक्रमा, अयोध्या वारी , स्टॅचू ऑफ युनिटी, तुळजापूर, शेगाव, शिर्डी, शिवनेरी किल्ला, अशा अनेक वऱ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. तर शेवगावचे सुपुत्र तहसीलदार संतोष काकडे यांच्या ग्रुपने सायकल वर काश्मीर ते कन्याकुमारी असा यशस्वी प्रवास केला आहे.