येसगावमध्येच बिबट्याने पुन्हा एका महीलेचा गळा घोटला

संतप्त नागरीकांनी रास्तारोको करून आपला आक्रोश व्यक्त केला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील एका ६० वर्षीय महीलेवर बिबट्याने  प्राणघातक हल्ला केल्याने त्यांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकाच आठवड्यात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी करीत नागरीकांनी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करीत आपला आक्रोश व्यक्त केला.

 या घटनेची मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील येसगाव शिवारातील भास्कर वस्ती  येथील शांताबाई अहिल्याजी निकोले या आपल्या राहत्या घराजवळील शेतात सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान जनावरांसाठी घास कापत असताना कापसाच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शांताबाई निकोले यांच्यावर अचानक झडप घालून त्यांच्या गळा आपल्या जबड्यात धरून झटके देत असल्याचे  काही महीलांनी पाहीले त्यात दोन महीला धाडस करुन शांताबाई निकोले यांच्या बिबट्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी धावल्या.

माञ बिबट्या त्या महीलावर देखील चाल करु लागल्याने महीलांनी आरडाओरडा केली त्यामुळे इतर महीला समुहाने धावून गेल्याने बिबट्याने शांताबाईचा गंळा जबड्यातून सोडून धुम ठोकली, परंतु तोपर्यंत शांताबाई निकोले त्याच्या हल्ल्यात कायमच्या निपचित पडल्या होत्या. बिबट्याच्या हल्यात महीलेचा मृत्यू झाल्याची माहीती वाऱ्यासारखी पंचक्रोशीतील पसरताच नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली. मयत शांताबाई निकोले यांचा मृतदेह पाहुन आलेल्या नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि काही क्षणातच नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करीत चक्का जाम केला. 

आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे घटनास्थळी जावून निकोले कुटूंबाचे सांत्वन करीत संबंधीत घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित प्रशासनाला धारेवर धरत नरभक्षक बिबट्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची तसेच नागरीकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबवण्याची मागणी करुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

 दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन घटनेचे गांभीर्य सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त करीत माहीती देताना म्हणाले की, नरभक्षक बिबट्यासह इतर बिबट्यांचा बंदोबस्त पुण्याच्या धर्तीवर करणार असुन पकडण्यासाठी लागणारे पिंजरे कमी आहेत त्याकरीता साडे आठरा कोटींची तरतूद कूली आहे. तसेच नरभक्षक बिबट्याला गोळी घालुन ठार मारण्यासाठीची व्यवस्थित वनविभागाच्यावतीने केली जाईल तशा सुचेना वनविभागाचे राज्य सेक्रेटरी रेड्डी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. बिबट्याच्या बंदोबस्त करण्याच्या योग्य त्या सुचना जिल्हाधिकारी यांनाही देणार असेही ते म्हणाले.

 यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना फोन लावून आपला संताप व्यक्त करीत त्वरीत बिबट्याला जेरबंद करा, अथवा ठार करा अशी मागणी करून आपला क्रोध व्यक्त केला. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी वनविभागाचे अधिकारी व नायब तहसीलदार  यांना धारेवर धरत तुम्ही किती लोकांचा बळी गेल्यानंतर बिबट्यांचा बंदोबस्त करणार? तुमच्याकडे बिबटे पकडण्यासाठी किती पिंजरे आहेत? पिंजऱ्यात पकडलेले बिबटे कुठे सोडता? सध्या तालुक्यात किती बिबटे आहे? आजपर्यंत तुम्ही काय उपाय योजना केले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत होते पण संबंधीत अधिकाऱ्यांकडे एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर नव्हते त्यामुळे कोल्हेंचा पारा चांगलाच चढला होता. 

 यावेळी सुमित कोल्हे म्हणाले की, जर वनविभागाला नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर आम्हाला परवानगी द्या आम्ही त्याचा योग्य करु म्हणत त्याला ठार मारण्याची परवानगी मागितली. शांताबाई निकोले व एका ४ वर्षाच्या मुलीचा बिबट्याने जीव घेतल्याने तालुका भयभीत झाला आहे. शाळा महाविद्यालयातील मुला-मुलींना पालक शाळेत पाठवण्यासाठी धजावत नाहीत. बर दिवसा येसगावयध्ये एका महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने. पंचक्रोशीतील नागरीक भयभीत झाले आहे. 

Leave a Reply