आकाच्या आदेशावरून काका निवडणुकीच्या रिंगणात – विवेक कोल्हे

आका आणि काका दोघांचाही बंदोबस्त कोपरगावकर करणार

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीची जसजशी तारीख जवळ येते तसतशी राजकीय धग वाढत आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अचानक कोल्हे यांची साथ सोडून आमदार काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर होताच तालुक्यात राजकीय उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाले. यावर युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी राञी उशिरा तातडीची पञकार परिषद घेवून काका कोयटे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टिकास्त्र सोडले.

यावेळी पञकारांशी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, कालपर्यंत काका कोयटे हे आमच्या बरोबर होते. नगरपालीका निवडणुकीची संपूर्ण रुपरेषा आखण्यात व ती कशी कार्यान्वित करायची या संबंधी काका कोयटे यांनी अनेक वेळा सुचना करून मार्गदर्शन केले. त्यांच्याच सुचनेप्रमाणे नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले. बुधवारी राञी पर्यंत काका कोयटे हे आमच्या संपर्कात होते आणि गुरुवारी सकाळी अचानक काका कोयटेंचा फोन आला कि, मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भविष्यात वरिष्ठ पातळीवर मोठी संधी मिळणार असल्याने मी तिकडे जातोय यावरून काका कोयटे हे कोपरगावच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसुन स्वत:च्या मोठ्या फायद्यासाठी उतरले आहेत. किंबहुना त्यांना उतरायला भाग पाडले आहे.

 शेजारच्या तालुक्यातील आकाच्या आदेशावरून काका निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे कोपरगावची जनता सुज्ञ आहे. आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त कोपरगावकर केल्या शिवाय राहणार नाही. काका कोयटे यांना ५० वर्षाने राजयोग आहे हे एका दिल्लीच्या जोतिष्याने भविष्यवाणी सांगितली नसुन प्रवरेच्या ज्योतिष्याने सांगितली असावी. वैयक्तिक स्वार्थासाठी व बाहेरच्या शक्तीचा राजकीय डाव आहे. त्यामुळे हि लढाई कोपरगावची राहीली नाही तर ही लढाई स्वाभिमानी कोपरगाव विरुद्ध तालुक्या बाहेरील शक्तींची झालेली आहे.

आम्ही पोपटावर व भविष्यवाणीवर विश्वास ठेवून राजकारण करीत नाही तर स्वत:वर विश्वास ठेवून विकासाचे राजकारण करतो. गोदावरीच्या तिरावर कोपरगावकरांचा स्वाभिमान गहाण ठेवणारे आम्ही नाही. तेव्हा प्रवरेच्या सल्ल्याने लादलेले पार्सल कोपरगावकर परत पाठवणार असे परखड टिका युवा नेते विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली.  काका कोयटे, आमदार आशुतोष काळे यांच्यावरही कोल्हेंनी शेलक्या शब्दात निशाणा साधला.

कोल्हे पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी इतरांचे मांडलिकत्व कधीच स्विकारले नाही. कोपरगावची अस्मिता टिकवण्याचे काम केले. अलीकडे बाहेरच्या तालुक्यातील शक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यात दुर्दैवाने तालुक्याच्या आमदारांनी त्यांचे मांडलिकत्व स्विकारले आहे. आमदारांनी कोयटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून हि निवडणूक आम्हाला अधिक सोपी केली आहे. विजयाचा गुलाल आम्हीच घेणार. मागच्या निवडणुकीची चुक कोपरगाव कर आता करणार नाही.

येत्या दोन दिवसांत दुध का दूध और पाणी का पाणी होईल. आमदारांनी निष्ठावंतांना घरचा रस्ता दाखवून बाहेरच्या शक्तीने लादलेला उमेदवार दिल्याने त्यांच्याच गटात मोठी खदखद आहे, त्याचा परिणाम येत्या काळात दिसणार आहे. केवळ या तालुक्याचा एक युवा कार्यकर्ता पुढे जात असल्याने बाहेरच्या शक्तीच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे राजकीय डावपेच टाकून शहकटशह करण्यात येत आहे.  तेव्हा कोपरगावची जनता बाहेरच्या शक्तीच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

काका कोयटे यांनी आपल्याला व्यक्तिगत स्वार्थासाठी आम्हाला अंधारात ठेवून राजकिय गणितं साधण्याचा केविलवाणी प्रयोग केला आहे. कोयटेंच्या सकाळच्या अॅक्शनवर दुपार नंतर रियाक्शन सुरु झाली यावरून आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. परिवर्तनाची हि वाट आहे. मतातून जनता दाखवणार आहे असे म्हणत विवेक कोल्हे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  या पञकार परिषदेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, संजय सातभाई, दिलीप दारुणकर, केशवराव भवर, बबलु वाणी, योगेश बागुल, संदीप देवकर, नारायण अग्रवाल, आदींची उपस्थिती होती. 

Leave a Reply