माझा कोयटेंना पाठींबा नाही, त्यांनी माझ्या नावाचा वापर करु नये
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक व नुकतेच कोपरगाव नगरपालीका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे ह्यांना या निवडणुकीत माझा कसलाही पिठींबा नसुन त्यांनी माझ्या नावाचा वापर करत असतील तर ते चुकीचं आहे अशी कबुली राधाकृष्ण विखे पाटील यांनी खुद्द भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना प्रत्यक्ष बोलुन दिली अशी माहीती स्नेहलता कोल्हे यांनी पञकाराशीं संवाद साधताना दिली.

नगराध्यक्षपद उमेदवाराचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. भारतीय जनता पार्टीचे मंत्री विखे हे जिल्ह्याचे प्रभारी आहे. मी त्यांना थेट विचारले की, काका कोयटे यांना तुम्ही निवडणूक सहकार्य करतात का त्यावर विखे पाटील यांनी मला सांगितले माझे नाव वापरून कोणी राजकारण करीत असेल तर ते चुकीचे आहे. विरोधी पार्टीच्या उमेदवाराला माझा पाठींबा नसणार असेही सांगितले. यावरून कोयटे माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांचे सहकार्य असल्याचे बोलतात म्हणजेच दिशाभूल करीत आहेत. कोपरगाव वासियांनी नगरपालिकेत भाजप-मित्रपक्षाला सत्ता दिली तर मुख्यमंत्री आपलेच आहेत त्यांचा निश्चित आपल्याला फायदा होईल असे हि त्या पुढे म्हणाल्या.

बिहार निवडणुकीत भाजप-मित्रपक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा विजय जल्लोष ढोल ताश्यांच्या गजरात साजरा करण्यात आला. पेढे वाटून आनंद साजरा केला कोल्हे व त्यांचे कार्यकर्ते आनंद साजरा करून एकमेकांचे तोंड करीत होते. याप्रसंगी माध्यमांशी कोल्हे बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीने सर्वसामावेश विकास केल्यामुळे यश मिळत आहे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विचारधरेला बिहारच्या जनतेने साथ दिली. आपले भविष्य, देशाची सुरक्षितता यावर विश्वास ठेवून विजय दिला. बिहारच्या जनतेने दिलेला विजय हा शुभ संकेत असून राज्यातही भाजप-मित्रपक्षाना सर्व निवडणुकांमध्ये मोठे यश मिळेल.

काका कोयटेंच्या उमेदवारीवर बोलताना कोल्हे म्हणाल्या, ज्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांनी ते अनेकांना नडलेले, भिडलेले, पठाणी वसुली, व्यक्तिगत त्रास याच्या सर्व कुंडल्या जमा केल्या आहेत. ते जरी जेष्ठ असले व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्यांनी ती वाईट वाटून घेवू नये. कारण तुम्ही आता मैदानात उतरला आहात. त्यामुळे टीकाटिपण्णीला सामोरे जावेच लागेल.

स्व.शंकरराव कोल्हे व आम्ही कधीही कोणाच्या पोटावर पाय देवून त्रास दिलेला नाही. माणुसकी, सर्व जाती धर्माला समाजातील प्रत्येक माणसाला संकटकाळी साथ दिलेली आहे. महापूर, कोरोना असो पहिल्यादा संजीवनी उद्योग धावून जातो. बिपीन कोल्हे यांनी उभ्या केलेल्या आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीसाठी प्रत्येकजण हक्काने संकटकाळी धावन येतो.

आम्ही सत्त्तेत नसलो तरी सामान्य जनतेसाठी काम करीत आलो आहोत. त्यामुळे सामान्य जनतेचा कोल्हे कुटुंबावर प्रचंड विश्वास असल्याने या निवडणुकीत आमचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. असे म्हणत काका कोयटे यांच्यावर विविध प्रकारे शाब्दिक प्रहार करुन कोल्हे यांनी या निवडणुकीत अनेक उलथापालथ होणार असल्याचे संकेत देत हि निवडणूक कोयटेंना आव्हान देणारी असल्याचे निदर्शनास आणुन दिले. तसेच बिहार सारखाच कोपरगाव मध्येही भाजप व मिञ पक्ष एकहाती विजय मिळवणार असल्याची खाञी व्यक्त केली.


