टक्केवारी टोळीचा बंदोबस्त करणार – विवेक कोल्हे

शक्ती प्रदर्शन करीत पराग संधान यांचेसह ३० उमेदवारांनी भरले अर्ज

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ :  भाजप, आरपीआय व मिञ पक्षाच्यावतीने पराग संधान यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या साक्षीने उमेवारी अर्ज भरले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विवेक कोल्हे म्हणाले की, या नगरपालीकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांना वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. हि टक्केवारी टोळी आहे. एका आर्थीक संस्थेत कोयटे हे अनेक आर्थीक गडबड करून टक्केवारीवर कर्जप्रकरणे करतात, नगरपालीकेच्या निवडणुकीतही हे टक्केवारीसाठीच उतरले आहेत.

या टक्केवारी टोळीचा मतदार मतदानरूपी योग्य तो बंदोबस्त करणार तसेच आमदार काळेंनी कोयटेंना राज्यातील एखादे महामंडळ अथवा राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे पद देण्याचे आमिष दाखवून निवडणुकीच्या रिंगणात कोयटेंना उतरवले आहे. कोयटेंना  निवडणुकीत  उतरुन  आमदारांनी कसलाही धक्का तंञ केला नसुन धोकातंञ केला आहे. केवळ निवडणुकीपुता  यांचा हा ढोंगीपणा सुरु आहे तो  फार काळ चालणार नाही. जनता त्यांना मतदानातून योग्यते उत्तर देईल.

या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येणार असुन गुलाल आम्हीच उधळणार कारण शहराच्या विकासाचा आराखडा आम्ही तयार केला आहे. तो जनतेसमोर संकेतस्थळावर मांडल्यामुळे नागरीकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. नगरपालिका आपल्या दारी हा प्रभाग निहाय उपक्रम राबवणार आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासाची रुपरेषा आमच्याकडे आहे.

नगराध्यक्षासह आमचे सर्व उमेदवर जनतेच्या सेवेसाठी सदैव हजर आहेत. आमचे उमेदवार बाहेरच्या शक्तीकडून आयात केलेले नसुन नागरीकांच्या कायम सुखादुखात सामिल होणारे आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारांच्या विजयाची घोडदौड कायम राहणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत विवेक कोल्हे यांनी आमदार काळे व काका कोयटे यांच्यावर निशाणा साधला. 

 यावेळी पराग संधान म्हणाले की, मी ही निवडणूक सत्तेसाठी लढत नसुन जनतेच्या सवेसाठी लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनमाणसांचे काम करीत असल्यामुळे मला या निवडणुकीत जनतेचे पाठबळ मिळत आहे असे म्हणत विजय आपलाच होणार अशी प्रतिक्या दिली. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आमदार काळे व काका कोयटे यांच्या कार्य शैलीवर सडकुन टीका करीत कुटील राजकीय डावपेचावर खंत व्यक्त केली.

 दरम्यान भाजप आरपीआय व मिञ पक्षाच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वञिक निवडणुकीत होईल तरलेल्या उमेदवारां समवेत  माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व प्रभागानिहाय ३० उमेवारांनी शहरातील महापुरुषांना अभिवादन करीत ढोलताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन करून कोपरगावकरांचे लक्ष वेधत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. 

Leave a Reply