नगराध्यक्ष पदासाठी ८, तर नगरसेवक पदासाठी १२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या ९ उमेदवार पैकी सुहासिनी कोयटे यांनी उमदेवारी अर्ज माघार घेतल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे काका कोयटे, भाजप मिञ पक्षाचे पराग संधान, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र झावरे, शिवसेना उबाठा गटाच्या सपना मोरे तर अपक्षामध्ये विजय वहाडणे, दिपक वाजे, योगेश वाणी व रहिमुलीसा कुरेशी हे आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कोणाला लाभदायक तर कोणाला तापदायक होतात हे आगामी काळात दिसणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत काहीतरी मोठ्या घडामोडी होतील असं वाटत होते पण दिपक वाजे यांच्या माघारीकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु  तसे काही घडले नसल्याने आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर ३० नगरसेवक निवडीकरीता कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी १२७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 

 उमेदवारी अर्ज  माघार घेण्याच्या दिवशी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत, सहाय्याक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सर्व निवडणुक यंञणा सज्ज ठेवून होते. त्यांनी दिलेल्या माहीती नुसार नगरपालीकेच्या निवडणुकीत १५ प्रभागातून सर्व मिळून १२७ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुक लढवणार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार आहेत. अर्ज माघार घेण्याच्या  शेवटच्या दिवसापर्यंत  १ उमेदवाराने अर्ज माघार घेतला तर नगरसेवक पदासाठी २५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे ८ नगराध्यक्ष पदासाठी तर १२७ नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडून लढाणार असल्याचे सांगण्यात आले.

 दरम्यान १५ प्रभागापैकी काही प्रभागात सरळ दुरंगी लढत असुन प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्र. ९ व ११  मध्ये ११ तर प्रभाग क्र. २, ४ व १४ मध्ये ९ उमेदवार एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. बाकी इतर ठिकाणी तिरंगी, चौरंगी, पंचरंगी व सप्तरंगी लढत होणार आहे.

 १५ प्रभागातील प्रभाग निहाय निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उतरलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे.  प्रभाग क्र. १ (अ)-  सोनाली संदीप कपिले, स्नेहा जनार्दन गायकवाड, दीपा वैभव गिरमे.  १(ब)- वैभव सुधाकर आढाव, दादा रखमाजी आवारे, सचिन शरदराव गवारे. प्रभाग क्र. २ (अ )- राहुल उत्तम खरात, संदीप तुकाराम निरभवणे,  योगेश छबुलाल पवार, राहुल चंद्रहास शिरसाठ.  २(ब)- स्वाती दीपक जपे, स्मिता शैलेश साबळे, फमिदा हसम शेख, संगीता श्रीनिवास पवार, न्याजोबी सरदारखों पठाण. प्रभाग क्र. ३(अ)- निर्मला सोमनाथ आढाव, डडियाल पल्लवी गुरमीत सिंग. ३(ब)-जनार्दन सुधाकर कदम, आदित्य रवींद्र गरुड, मयूर विजय गायकवाड, सुधाकर बाबुराव नरोडे. प्रभाग क्र. ४ (अ)- संजना संजय उदावंत, रंजना रमेश गवळी, मंदा पिराजी साळुंखे. ४(ब)-अतुल धनालाल काले, हनुमंत पांडुरंग नरोडे, भरत आसाराम मोरे, आकाश बबनराव वाजे, अतिश सतिश शिंदे, सुनील आसाराम साळुंखे  प्रभाग क्र. ५ (अ) – अमित चंद्रकांत आगलावे,  संतोष माधव शिंदे. ५ (ब) – वैशाली विजय वाजे, अर्चना विनोद गलांडे शोभा अशोक घायतडकर, प्रियंका किरण थोरात.

प्रभाग क्र. ६ (अ) –  सुनिता सुनील खैरनार, सारिका सुनील फंड, पद्मावती योगेश बागुल. ६ (ब) – विक्रमाआदित्य संजय सातभाई, संदीप रामदास डुबरे, मुकुंद रामेश्वर भुतडा, सलीम बनेमिया शेख, संदीप मोतीराम शेवाळे  प्रभाग क्र. ७ (अ) –  प्रसाद रघुनाथ बाळासाहेब आढाव, प्रतिभा सुनील शिलेदार, प्रसाद दिलीप सारंगधर. ७ (ब) –  गौरी मंदार पहाडे, सोनल अमोल अजमेरे, मोनिका प्रशांत कोपरे, काजल विशाल खरात.  प्रभाग क्र. ८ (अ)  – अनिता सुरेश चंदनशिव, अर्चना सुखदेव जाधव, सुनंदा माधव त्रिभुवन, मनीषा दत्तू पगारे, विमल भगवान मरसाळे, वर्षा प्रफुल शिंगाडे, वैशाली शुभम शिंदे. ८( ब) – इम्तियाज रफिक अत्तार, किशोर बाबुराव काळे,  खालिक जमालबाई कुरेशी, आरिफ करीम कुरेशी,  हैदर हमीद पठाण,  अर्जुन रघुनाथ मोरे. प्रभाग क्र. ९  (अ) –  जितेंद्र चंद्रकांत रणशुर,सागर निंबा आहेर, सिद्धेश शरद खरात, राजेंद्र जयदेव खंडीझोड, मधुकर विश्राम पवार, ९ ( ब) – लक्ष्मीबाई माधव आढाव, विजया संदीप देवकर, भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे, अंजना गंगाधर फडे, बिना विजय भगत, शमा आयुब शेख.  प्रभाग क्र. १० (अ) – रवींद्र दत्तात्रय कथले, डॉ.तुषार दादासाहेब गलांडे  १० (ब) – वृषाली गणेश आढाव, श्रेया श्रीपाद भसाळे, माधवी राजेंद्र वाघचौरे.

प्रभाग क्र. ११ (अ) – स्वाती संतोष आरणे, अंजना संजीव कांबळे, सोनम अरुण त्रिभुवन, संगीता गुलाब भालेराव, उषा सोमनाथ मस्के.  ११ ( ब) – योगेश वसंत उशीर, प्रशांत बाळासाहेब कडू, शुभम कैलास काळे, आसिफ मेहमूद पठाण, राजेंद्र श्रावण लोखंडे, योगेश छबुराव शिंदे,शरफुद्दीन शमशुद्दीन सय्यद.  प्रभाग क्र. १२ (अ) विजया मीनानाथ आंग्रे, रहमुनिस्सा राज महमद कुरेशी, जयश्री मीनानाथ चव्हाण, सविता कैलास मंजुळ, भारती शामकांत शिंपी, सुम्मेया इरफान शेख.  १२ (ब) – अक्षय गणेश जाधव, योगेश बन्सीलाल मोरे, सनी रमेश वाघ,   हाजीमेहमुद  मनवरभाई सय्यद .   प्रभाग क्र. १३ (अ) – शिवाजी आनंदा खांडेकर,  जफर शफी पिंजारी, आकाश भास्कर पंडोरे, स्वप्निल दिलीप मंजुळ.  १३ (ब) – जुलेखा मेहबूब पठाण, नीलफर फिरोज खान पठाण ,प्रतिभा सुरेंद्र बेलदार, शेख हिनाकौसर मुक्तार. 

प्रभाग क्र. १४ (अ) -शंकर वसंतराव गंगुले, अविनाश कैलास पाठक, इकबाल गनी बागवान, वाल्मीक जयसिंग लहिरे. १४ (ब) – विद्या राजेंद्र सोनवणे,  यास्मिन गनी बागवान, परीगाबाई सुनील राठोड, सविता अशोक लांडगे, माधुरी मच्छिंद्र शिंदे .  प्रभाग क्र. १५ (अ) – सुरेखा विनोद राक्षे, स्वप्नाली वैभव कानडे, वंदना लक्ष्मण साबळे.  १५ (ब) – अनिल विनायक आव्हाड, वैभव बाबासाहेब चव्हाण, विनोद साहेबराव नाईकवाडे, साहिल रामचंद्र लकारे, गगन अनिल हाडा. हे एकमेकांविरुद्ध उभे असले तरीही अपक्ष उमेदवारांची संख्या व चार पक्ष्यांच्या उमेदवारांच्या ताकतीत कोणाच्या बाजूने मतदार राजा कौल दिल्याने तो याची उत्सुकता ३ डिसेंबर पर्यंत असणार आहे.

 काळे-कोल्हे यांच्यासाठी अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिपक वाजे महत्वाचे ठरले.  अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत युवा नेते विवेक कोल्हे  माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच त्यांचे कार्यकर्ते हे  वाजेंनी अर्ज माघार घ्यावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत होते तर आमदार आशुतोष काळे, काका कोयटे व त्यांची संपूर्ण यंञणा वाजेंनी उमेदवारी अर्ज  माघार घेवू नये यासाठी प्रयत्न करीत होते. या सर्वांमध्ये दिपक वाजे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याने अखेर वाजे अपक्ष रिंगणात उतरल्याने त्यांचा फायदा कोणाला होतो ते निकालानंतर कळेल तो पर्यंत धाकधूक सुरुच राहील.

Leave a Reply