अपक्ष उमेदवार दिपक वाजेंचा पराग संधान यांना जाहीर पाठिंबा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडत असुन नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार व ज्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती असे दिपक वाजे यांनी अचानक आज निवडणुकीत माघार घेत भाजपचे उमेदवार पराग संधान यांना जाहीर पाठिंबा दिल्याने कोल्हे व वाजे यांचे मनोमिलन झाल्याने निवडणुकीची दिशा बझलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात पञकार परिषद घेवून माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिपक वाजे हे आमच्या कुटूंबातील सदस्य आहेत वाजे व कोल्हे परिवाराचे ऋणानुबंध अनेक वर्षापासूनचे आहेत. त्यामुळे त्यांच्या काही मागण्या होत्या त्या खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावच्या जाहीर सभेत सांगितल्या त्यात प्रामुख्याने अतिक्रमण धारक घरकुलांचा विषय होता.

बेघरांना घरे देण्याचे जाहीर झाल्यामुळे तसेच वाजेचे बंधू आकाश वाजे यांना प्रभाग क्र. ४ मधून नगरसेवक पदाची उमेदवारी हवी होती तीही दिल्याने अखेर दिपक वाजे हे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेत भाजप,आरपीआय मिञ पक्षाचे उमेदवार पराग संधान यांना पाठींबा जाहीर केल्याचे कोल्हेनी सांगितले तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील पार्टीचे उमेदवार अतुल काले यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आकाश वाजे यांना पाठिंबा दिला आहे.

अतुल काले यांना १५ प्रभागातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली असुन त्यांना भविष्यात योग्य तो सन्मान दिला जाईल. या निर्णयामुळे विजयाचा गुलाल आपलाच  निश्चित आहे. अतुल काले हे समजदार व मोठ्या मनाचे आहेत ते  सर्व बाजूने प्रयत्न करणारे आमचे नेते आहेत.त्यामुळे या निवडणुकीत आमच पारडं जड झालं आहे.असे सांगून कोल्हेंनी निवडणुकीचे नवे समिकरण केले आहे.

 यावेळी दिपक वाजे म्हणाले की, वाजे -सन  २०१०-११ मध्ये ६७० घरं अतिक्रमणात उध्वस्त झाली त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली होती.  त्या लोकांची अवस्था बिकट झाली होती. त्यांच्या न्याय हक्कासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो त्याच विषयासाठी मी लढणार होतो. पण तो विषय मार्गी लावणार असल्याचे अभिवचन मिळाल्यामुळे मी या निवडणुकीतून माघार घेवून पराग संधान यांना पाठींबा देत आहे असे सांगितल्याने भाजप आरपीआय मिञ पक्षाच्या उमेदवारांना बळ मिळाले आहे. 

Leave a Reply