कोयटेंनी प्रचार पातळी सोडली, विवेक कोल्हेंनी सुनावले खडेबोल

कोपरगाव प्रतिनिधी. दि. २९ : ज्यांनी आत्तापर्यंत केवळ स्वत:च्या फायद्यासाठी काम करतात कोपरगाव शहराचे आजपर्यंत कुठलेही भले न केलेल्या व्यक्तीने फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हे कुटुंबावर तथ्यहीन भाष्य करतात. त्यावेळी त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी  कोपरगावची जनता सक्षम आहे. कारण कोल्हे कुटुंबाने आजवर शहरासाठी केलेली विधायक कामे जनतेसमोर आहे.

स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अनेकांना पुढे आणले त्यात कोयटे होते हे ते सोयीस्कर विसरले असावे. आमच्यावर बालिश आरोप करणारे कोयटे सुपुत्र हे वर्षानुवर्ष दिसत नाही त्यांनी वर नाकाने बोलु नये. चोर तो चोर वर शिरजोर यासारखे बोलू नये. अशा शब्दात युवानेते विवेक कोल्हे यांनी कोयटे यांचा समाचार घेतला.  

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या रणधुमाळी प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले अशातच विविध सभांमधून कोयटे परिवार कोल्हे यांच्यावर टिका करीत असल्याने कोल्हे यांनीही शहरातील विवीध सभांमधून कोयटे यांच्यावर  शाब्दिक प्रहार सुरु केले.

ते पुढे म्हणाले, आर्थीक व इतर  गैरव्यवहातुन काका कोयटे यांच्यावर ४२० सारखे आरोप झालेले आहेत. फसवणूक, ठकवनुक, विश्वासघात या सारखे आरोपाचे त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याचे दिसतात. त्यामुळे कोयटेंनी कुणावर खोटे आरोप करण्यापूर्वी त्यांच्या सुपुत्राचा अभ्यास केला पाहिजे. स्वतः संदीप कोयटे यांच्याकडे कॅनरा बँकेची थकीत कर्जाची परतफेड न केल्याने वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झालेल्या आहेत.

केवळ काही तरी यांना लपवा छपवी करायची असल्यामुळेच त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली असताना पुन्हा हा निवडणुकीचा निर्णय घेतला आहे हे सर्वश्रुत झाले  आहे.व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करण्यात आम्हाला अधिकचा रस नाही आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन काम करणारे लोक आहोत पण जर कुणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी आपली आहे.

मी स्व. कोल्हे साहेबांचा नातू आहे, त्यामुळे विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम करणार आहे. टिळकनगर येथील प्रभाग साभामध्ये कॉर्नर सभेत ते बोलत होते. या प्रभागातील दोन्ही उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी भरीव लीड द्यावे मी या प्रभागाचे विकासाचे पालकत्व स्वीकारेल असे आवाहन मतदारांना कोल्हे यांनी करुन आमदार काळेसह कोयटे पिता पुञांचे कारनामे जनतेसमोर मांडत शेलक्या शब्दात निशाणा साधला.