कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रचाराचा धुराळा उठत असताना अचानक समता पतसंस्थेच्या बाबतीत उलटसुलट चर्चेला उधान आले. शेजारच्या जिल्ह्यांतील काही थकबाकीदार समता पतसंस्थेने आपली कशी फसवू केली किंवा कशी मालमत्ता घेतली यावरुन थेट इडी, सीबीआय ते आर्थीक गुन्हे शाखेच्या चौकशी पर्यंत जाऊन कोर्टाच्या दारापर्यंत कशी प्रकरणे गेलीत व चालु आहेत आदीवर पञके, काढली, व्हिडिओ तसेच विविध प्रसार माध्यमांनी केलेल्या बातम्यावरून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा समता नगारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांची कोंडी करणारे वातावरण निर्माण झाले. दबक्या आवाजात सर्वञ चर्चा सुरु झाल्यामुळे अखेर समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे व संचालक संदीप कोयटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या साक्षीने सर्व काही सांगण्याचे ठरवले आणि समताच्या सभागृहात पञकार परिषद घेवून सर्वच सांगुन टाकले.

यावेळी संचालक संदीप कोयटे म्हणाले की, समताची बदनामी करण्याचे काम दुसरं तिसरं कोणी करत नसुन आमचे पाहुणेच करीत आहेत. ते समताचे मोठे थकबाकीदार असुन नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील ते आहेत. त्यांच नाव वसंत घोडके आहेत आमचे ते पाहुणे आहेत. वसंत घोडके यांनी ५ वर्षापुर्वी समताकडून एका व्यवसायाकरीता कर्ज घेतले होते. त्यांनी एक स्वप्न पाहीले होते व ते आम्हालाही दाखवले होते. त्यांची मालमत्ता तारण ठेवून समताकडून ज्या कामासाठी कर्ज घेतले होते त्यासाठी पैसे न वापरता त्याचा दुरुपयोग केला.

कर्जाचे हाप्ते वेळेवर भरले नाही. थकबाकीदार म्हणून संस्थेच्या व सहकार कायद्यानुसार वेळोवेळी नोटीसा देवुन योग्य ती कारवाई केली. त्यांच्या मालमत्तेची जप्ती करून शासकीय किमतीनुसार अर्थात ३ कोटी ५० लाख किंमत काढण्यात आली. तीनवेळा लिलाव करुनही कोणीही बोलीदार अर्थात मालमत्ता घेण्यासाठी आला नाही. नियमानुसार घोडकेंची मालमत्ता समता पतसंस्थेच्या नावावर वर्ग करण्यात आली. त्यानंतर खुद घोडके मनचंद नावाच्या व्यक्तीला घेवून आले व १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ५ कोटी ५ लाखाला त्यांची मालमत्ता विक्री प्रक्रिया करून त्यांच्या साक्षीने संबधीत सर्व रक्कम थकीत कर्जापोटी भरण्याची व्यवस्था झाली. घोडके यांनी उर्वरित कर्जापोटी पुन्हा त्यांचे इतर गाळे विकुन १६ जुलै २०२४ ला १ कोटी १८ लाख रुपये थकीत कर्जापोटी भरले याचाच अर्थ त्यांचे कर्ज थकीत होते म्हणून भरले.

ते थकबाकीदार आहेत म्हणून पैसे भरले परंतु इतरांना समता बद्दल चुकीची माहीती देवून बदनामी करत आहेत त्यांनी समता बरोबर अनेक संस्थांना बुडवल्याचे संदीप कोयटेंनी सांगितले. तसेच छञपती संभाजीनगर येथील संजय मोरे यांनीही समतासह अनेक बॅंका व संस्थांची आर्थीक फसवणूक केल्याचे सांगुन कोयटेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणचे थकबाकीदार एकाचवेळे कसे आमच्याविरूध्द एकवटून आर्थीक गुन्हे शाखा, ईडी, सीबीआय च्या चौकशी बरोबर सहकार खात्यामार्फत चौकशीचे कारनामे केले. पण कितीही चौकशी झाली तरी समताला सर्वच ठिकाणी क्लिनचिट मिळत आहे असे सांगून चालु असलेल्या चर्चेवर कोयटेंनी पुर्णविराम दिला.

तर तक्रारदारांचे आरोप काय होते की, नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील वसंत मधुकर घोडके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझी मालमत्ता ही व्यवसायीक होती त्याची बाजार भावा प्रमाणे किंमत ४० ते ४५ कोटींची असुनही समताने ती मालमत्ता शेती म्हणुन केवळ ५ कोटी ५ लाखाला विकली. माझ्यासह सरकारला फसवले आहे. त्यांनी इतरही अनेक आरोप समतावर केले. तर छञपती संभाजीनगर येथील संजय मोरे यांनीही समताने फसवणूक केल्याचे पञक काढल्यामुळे समता पतसंस्था राज्यात चर्चेत आल्याने अखेर कोयटेंना अनेक बाबींचा खुलासा करावा लागला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर समताची चर्चा सुरु झाल्याने कोयटेंनी पञकार परिषद घेवून समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. थकबाकीदार व समता पतसंस्थेच्या वसुलीवर चर्चा सुरु झाली असली तरीही कोयटेंनी समताच्या ठेविदारांचा तळतळाट घेणार नाही पण थकबाकीदारांचा रोष घ्यायला तयार आहोत असे सांगुन संस्थान नियमानुसार कामकाज करत असल्याचे शेवटी सांगितले.


