स्नेहलता कोल्हेंवर आरोप म्हणजेच स्त्री शक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – सुरेखा राक्षे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : नुकतेच एका प्रचार सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार काका कोयटे यांनी बोलताना स्नेहलता कोल्हे यांच्याबद्दल खोटे आरोप करत एकेरी उल्लेख केला आहे हे अतिशय निंदनीय आहे. पुरुषप्रधान समाजात प्रथम महिला आमदार होण्याचा मान कोल्हे  यांना कोपरगाव मतदारसंघात मिळाला.त्या राजकारणात नसताना सुद्धा महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे. बचत गटाच्या माध्यमांतून मोठे काम केले आहे जे आजही सुरू आहे.

महिला बचत गटांना उद्योग व प्रशिक्षण देत आर्थिक स्वावलंबी केले.महिला गारमेंट क्लस्टरच्या माध्यमातून शेकडो रोजगार दिला. ग्रामीण भागातील पहिले कॉल सेंटर उपलब्ध करत हजारो युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्या. वेगवेगळे कोर्सेस सुरू करून न्याय दिला त्यामुळे या वयात काका कोयटे यांना असे बोलणे शोभले नसल्याची टीका माजी नगराध्यक्षा सुरेखा राक्षे यांनी केली आहे.

स्नेहलता कोल्हे यांचे महिला वर्गात एक विश्र्वासच नाते आहे,त्याला तडा द्यावा आणि आपल्याला मते मिळावी असा निंदनीय प्रकार विरोधकांनी करणे ही भारतीय नारी शक्तीचा अवमान करणारी बाब आहे.कोल्हे यांची खोटी बदनामी करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा डाव कोयटे यांचा दिसतो आहे. महिलांची पंचवीस वर्षे का आठवण यांना आली नाही आत्ताच का निवडणुकीत अगरबत्ती आठवू लागल्या असा टोलाही राक्षे यांनी लगावला आहे.

कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगरपालिका, बस स्थानक, फायर स्टेशन, गोकुळनगरी पूल, हद्दवाढ भाग, बाजार ओटे ही कामे सध्याच्या विरोधकांना दिसणार नाही कारण त्यांना कोल्हे विरोधाची काविळ झाली आहे. एखाद्या जबाबदार पदावरील महिला लोकप्रतिनिधीबद्दल अशा एकेरी त्या बाईंनी म्हणत खोटे आरोप करणे ही निषेधार्य बाब असून समस्त महिला वर्गाच्या वतीने काका कोयटे यांचा निषेध करतो असेही शेवटी राक्षे म्हणाल्या आहेत.

Leave a Reply