फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील छत्रपती बॉईज ग्रुपचे अध्यक्ष फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी आफताफ मन्सुरी, मोहीज मन्सुरी, मोहसिन मन्सुरी, परवेज मन्सुरी, आरीष मन्सुरी, कय्युम मन्सुरी, इम्रान मन्सुरी, सोहेल मन्सुरी, आनीष मन्सुरी, रमिज मन्सुरी, वसीम मन्सुरी, फरान मन्सुरी, अमन मन्सुरी, शाहीद मन्सुरी, सलमान मन्सुरी सतीश व्हाव्हळ, समीर मणियार, सलीम शेख, आसिफ शेख, अमन मणियार, शाहिद मणियार, योगेश त्रिभुवन, गणेश मोरे, नाना पेटारे, रामेश्वर मोरे, विपुल, मयूर लांडे, लक्ष्मण लांडे, सार्थक शेलार, विलास पवार, करण शिंदे, अनिल नरोडे, सतीश पटाईत, किशोर नरोडे, दीपक डोळस, अरमान शेख, किशोर बाचकर, वसीम खाटीक, एजाज पठाण, शाहिद तांबोळी, ऋषिकेश खरात, अनिकेत खरात, शाहिद बागवान, अतिक शेख, दत्तू सोळसे, अल्तमश बेग, अल्ताफ बेग, सचिन रोकडे, अमित सोळसे, सचिन सोळसे, मुसा शेख आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विवेक कोल्हे म्हणाले, या प्रभावी नेतृत्वांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, व्यापक जनसंपर्काचा व स्थानिक प्रभावाचा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार आहे. या माध्यमातून भाजपला राजकीय गती मिळून निर्णायक विजयाकडे वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी दिलीपभाऊ दारुणकर, राजाभाऊ शिंदे, प्रशांत कडू, सोमनाथ मस्के, बाळासाहेब पवार, संपत चंदनशिव, भारतजी रोकडे, नवाब मन्सुरी, सलीमभाई मन्सुरी, असलम शेख, बंटी कांबळे, अल्ताफ पठाण, सलीम पठाण, रोहित कणगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


