विवेक कोल्हे ठरले किंग मेकर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला असुन भाजप, आरपीआय व मिञ पक्षाचे पराग संधान हे विजयी झाले आहेत तर ३० पैकी तब्बल १९ नगरसेवक भाजप व पञ पक्षाचे निवडून आणुन भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे कोपरगावच्या निवडणुकीचे किंग मेकर ठरले आहे.

कोपरगावच्या या प्रचंड अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. काळे-कोल्हे यांच्या पारंपरिक लढतीत काका कोयटेंच्या इंट्रीने निवडणुकीची दिशा अचानक बदलल्याने येथील निवडणूक कोल्हे विरूद्ध काळे, कोयटे अशी झाली होती. त्यात दोन्ही शिवसेना मैदानात उतरल्याने कोण नगराध्यक्ष होणार याकडे लक्ष लागले होते. माञ आज निवडणुकीच्या निकालाच्या पहील्या फेरी पासुन कोयटे व संधान यांच्यात कांटे की टक्कर सुरु झाली. अवघ्या काही मताच्या फरकाने दोघात चढ उतार सुरु होता. अखेर शेवटच्या फेरीला पराग संधान यांनी बाजी मारत काका कोयटे यांचा ४०९ मतांनी पराभव केला.

यापुर्वीच्या निवडणुकीत पराग संधान यांचा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विक्रमी मतानी पराभव केला होता. या निवडणुकीत पराग संधान यांच्याकडून वहाडणे यांचा निचांकी मतानी पराभव झाला. त्यासोबतच राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या काका कोयटे, सर्वाधिक लोकप्रिय असलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे या दिग्गजांचा एकाचवेळी पराभव करून पराग संधान यांनी नवा विक्रम केला तर युवा नेते हे या निवणकुकीचे किंग मेकर ठरले आहेत.

या अटतटीच्या लढतीत भाजप मिञ पक्षाच्या नगराध्यक्षा सह १९ नगरसेवक निवडून आल्याने पालीकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात काळेंचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वाधिक मताने प्रभाग क्रमांक ३ मधील जनार्दन कदम हे निवडून आले आहेत त्यांना २ हजार ५२ मते मिळाल्याने ते सर्वाधिक मते घेणारे नगरसेवक ठरले आहेत.

दरम्यान भाजपचा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक निवडून आल्यानंतर कोल्हे परिवारासह भाजप मिञ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, नुतन नगराध्यक्ष पराग संधान यांची कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचत गुलालाची उधळण करुन विजयाच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विवेक कोल्हे यांनी दंड थोपटून आकाशात हात फिरवत विजय साजरा केला.

मिरवणूक विवेक कोल्हे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत कोण आला रे कोण आला कोपरगावचा वाघ आला असे म्हणत घोषणाबाजी सुरु केली. विवेक कोल्हे यांच्या आगमनाने मिरवणुकीची रंगत अधिकच रंगली. खुद स्नेहलता कोल्हे यांनी डिजेच्या गाण्यावर ठेका धरून आपल्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित केला. पराग संधान यांचा विजय होताच विनोद राक्षे यांना आनंदाश्रू आवरता आले नाही त्याच्या प्रभाग क्रमांक १५ मधील मतदारांनी खऱ्या अर्थाने संधान यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पडलेले पते पुढील प्रमाणे – पराग संधान (भाजप) १८ हजार ५०३(विजयी), काका कोयटे (राष्ट्रवादी कॉंगस) – १८ हजार ९४, राजेंद्र झावरे (शिंदे शिवसेना)- ३४९६, सपना मोरे (उबाठा)-२१७६, विजय वहाडणे (अपक्ष)-५९१, नोटा -३८६

दरम्यान नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रभाग निहाय पढलेले मते पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. १ अ -सर्वसाधारण महिला सोनाली कपिले (राष्ट्रवादी)-१५३७- (विजयी), दीपा गिरमे -(भाजप)-८८४, स्नेहा गायकवाड (शिंदे शिवसेना)-१३६, नोटा-३३. प्रभाग क्र.१ -ब–सर्व साधारण, वैभव आढाव (भाजप)-१२१९ (विजयी), सचिन गवारे (राष्ट्रवादी)-११९५, दादा आवारे (शिंदे शिवसेना)-१३३, नोटा-४६, प्रभाग क्र. २- अ– अनुसूचित जाती राहुल शिरसाठ (राष्ट्रवादी)-१४७१(विजयी), राहुल खरात (भाजप)-१३५३, संदीप निरभवणे (अपक्ष) -८६ योगेश पवार (शिंदे सेना)-३५८, नोटा-८०, प्रभाग क्र. २ ब -सर्वसाधारण महिला स्मिता साबळे (राष्ट्रवादी)-१४४१ (विजयी), स्वाती जपे (भाजप)-१२०३, न्याजोबी पठाण (अपक्ष)-४२, संगीता पवार (शरदचंद्र पवार)–१९५, फमिदा शेख (शिंदे सेना)-४१५, नोटा-५२, प्रभाग क्र. ३- अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निर्मला आढाव (राष्ट्रवादी)-१५३५(विजयी), पल्लवी डडीयाल (भाजप)-१४२३, नोटा-५०, प्रभाग क्र.३- ब -सर्वसाधारण जनार्दन कदम (राष्ट्रवादी)-२०५२(विजयी), मयूर गायकवाड (भाजप)-७९२, आदित्य गरुड (शिंदे सेना)-१०५ सुधाकर नरोडे (अपक्ष) -३३, नोटा-२६,

प्रभाग क्र. ४ -अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला संजना उदावंत (भाजप)-१३३०(विजयी), रंजना गवळी (राष्ट्रवादी)-१३०२, मंदा साळुंखे (शिंदे सेना)-१६६, नोटा-३८, प्रभाग क्र. ४- ब -सर्वसाधारण आकाश वाजे (भाजपपुरस्कृत)-१५६५(विजयी), हनुमंत नरोडे (राष्ट्रवादी)-८७७, भरत मोरे (उबाठा)-२१४, सुनिल साळुंके (शिंदे सेना)-१५२, नोटा-२८, प्रभाग क्र.५ – अ -अनुसूचित जमाती संतोष शिंदे (भाजप)-१४०४(विजयी), अमित आगलावे (राष्ट्रवादी)-८६६, नोटा-९८, प्रभाग क्र.५- ब -सर्वसाधारण महिला वैशाली वाजे (भाजप)-१३७१(विजयी), शोभा घायतडकर(राष्ट्रवादी)-५५०, अर्चना गलांडे (शिंदे सेना)-३३७, प्रियांका थोरात (अपक्ष) -६४, नोटा-४६, प्रभाग क्र.६- अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पद्मावती बागुल (लोकसेवा आघाडी)-१९२०(विजयी), सारिका फंड (राष्ट्रवादी)-१०६१, सुनिता खैरनार (उबाठा)-२१८, नोटा-६२, प्रभाग ६- ब -सर्वसाधारण विक्रमादित्य सातभाई (लोकसेवा आघाडी)-१२९४(विजयी), मुकुंद भुतडा (राष्ट्रवादी)-१२३७, संदीप डुबरे (शिंदे सेना)-१३८, सलीम शेख (अपक्ष)-४१९, संदीप शेवाळे (उबाठा)-१३७, नोटा-३६

प्रभाग क्र. ७- अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग – प्रसाद आढाव (भाजप)-१४६६(विजयी), प्रतिभा शिलेदार (राष्ट्रवादी)-१२२५, प्रसाद सारंगधर (शिंदे सेना)-४७७ , नोटा-४०, प्रभाग क्रमांक ७ ब -सर्वसाधारण महिला गौरी पहाडे (राष्ट्रवादी)-१९८५(विजयी), सोनल अजमेरे (भाजप)-१०५६, मोनिका कोपरे (उबाठा)-४२, काजल खरात (शिंदे सेना)-९३, नोटा-३२, प्रभाग क्र.८ अ –अनुसूचित जाती महिला मनीषा पगारे (भाजप)-१३५८(विजयी), विमल मरसाळे (राष्ट्रवादी)-१२३०, अनिता चंदनशिव (अपक्ष)-३८, अर्चना जाधव (अपक्ष)-६१, सुनंदा त्रिभुवन अपक्ष)-६२, वर्षा शिंगाडे (शिंदे सेना)-२८८, वैशाली शिंदे (शरदचंद्र पवार)-८०, नोटा-३२, प्रभाग क्र.८- ब-सर्वसाधारण इम्तियाज अत्तार (राष्ट्रवादी)-१५०५(विजयी), आरिफ कुरेशी (भाजप)-११०२, किशोर काळे (शिंदे सेना)-३५९, हैदर पठाण (अपक्ष)-६१, अर्जुन मोरे(अपक्ष)-८९, नोटा–३१, प्रभाग क्र. ९ अ -अनुसूचित जाती, जितेंद्र रणशूर (भाजप)-१०९१(विजयी), सागर आहेर (राष्ट्रवादी)-८२४, सिद्धेश खरात(शिंदे सेना )-१४६, राजेंद्र खंडीझोड (अपक्ष)-३८, मधुकर पवार (उबाठा)-२६३, नोटा-५०, प्रभाग क्र. ९ ब- सर्वसाधारण महिला विजया देवकर (भाजप)-१०८९(विजयी), अंजना फडे (राष्ट्रवादी)-६८२, लक्ष्मीबाई आढाव (शिंदे सेना)-१४६, भाग्यश्री धोत्रे (अपक्ष)-२६४, बिना भगत (उबाठा)-९१, शमा शेख (अपक्ष)-११७, नोटा-२३,

प्रभाग क्र.१० अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग रवींद्र कथले (लोकसेवा आघाडी)-१५८४(विजयी), तुषार गलांडे (राष्ट्रवादी)-११०७, नोटा-३९, प्रभाग क्र.१० ब -सर्वसाधारण महिला माधवी वाघचौरे (राष्ट्रवादी)-१३८९(विजयी), वृषाली आढाव (भाजप)-१११२, श्रेया भसाळे (शिंदे सेना)-१७४, नोटा-५५, प्रभाग क्र. ११ अ -अनुसूचित जाती महिला सोनम त्रिभुवन (राष्ट्रवादी)-९९६(विजयी), उषा म्हस्के (भाजप )-८१६, स्वाती आरणे(अपक्ष)-१४२, अंजना कांबळे (शिंदे सेना)-३४१, संगीता भालेराव (उबाठा)-२३८, नोटा-६२, प्रभाग क्र.११ ब -सर्वसाधारण, प्रशांत कडू (भाजप)-७९२(विजयी), शुभम काळे(राष्ट्रवादी) -६५५, योगेश उशीर (शिंदे सेना)-४४२, राजेंद्र लोखंडे (अपक्ष)-४३, योगेश शिंदे (उबाठा)-२६५, शरफुद्दीन सय्यद (अपक्ष)-३६८, नोटा-३, प्रभाग क्रमांक १२ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सविता मंजुळ (भाजप)-१२९०(विजयी), विजया आंग्रे (राष्ट्रवादी)-११४२, जयश्री चव्हाण (शिंदे सेना)-२७१, भारती शिंपी (अपक्ष)-४९, शेख सुम्मैया (अपक्ष)-३१९, नोटा-२७, प्रभाग क्र. १२ ब -सर्वसाधारण हाजी मेहमूद सय्यद (राष्ट्रवादी)-११७६(विजयी), सनी वाघ (लोकसेवा आघाडी)-११५१, अक्षय जाधव (शिंदे सेना)-१०, योगेष मोरे (उबाठा)-३१९, नोटा-४२,

प्रभाग क्र. १३ अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्वप्नील मंजुळ (भाजप)-१२३४(विजयी), शिवाजी खांडेकर (राष्ट्रवादी)-१०४०, जफर पिंजारी (अपक्ष)-५३६, आकाश पंडोरे (शिंदे सेना)-२६४, नोटा-३५, प्रभाग क्र.१३ ब -सर्वसाधारण महिला निलोफर पठाण (भाजप)-१४९४(विजयी), हीनाकौसर शेख (राष्ट्रवादी)-९६५, जूलेखा पठाण (अपक्ष) -५५, प्रतिभा बेलदार (शिंदे सेना)-५१३, नोटा-८२, प्रभाग क्र.१४ अ– नागरिकांचा मागास प्रवर्ग वाल्मिक लहिरे (राष्ट्रवादी)-११५६(विजयी), अविनाश पाठक (भाजप)-९४२, शंकर गंगुले (शिंदे सेना)-११२, इकबाल बागवान (शरदचंद्र पवार)-२९९, नोटा-३३, प्रभाग क्रमांक १४ ब -सर्वसाधारण महिला विद्या सोनवणे (भाजप)-११८५(विजयी), माधुरी शिंदे (राष्ट्रवादी)-८४७, यास्मिन बागवान (शरदचंद्र पवार)-२८१, परीगाबाई राठोड (शिंदे सेना)-१५२, सविता लांडगे (अपक्ष)-४७, नोटा-३१, प्रभाग क्रमांक १५ अ -अनुसूचित जाती महिला सुरेखा राक्षे (भाजप)-१६३४(विजयी), स्वप्नाली कानडे (राष्ट्रवादी)-११०२, वंदना साबळे (उबाठा)-२०४, नोटा -५२, प्रभाग क्रमांक १५ ब –सर्वसाधारण अनिल आव्हाड (लोकसेवा आघाडी)-१५४०(विजयी), विनोद नाईकवाडे (राष्ट्रवादी)-८९८, वैभव चव्हाण (शिंदे सेना)-१३८, साहिल लकारे (अपक्ष)-१४, गगन हाडा (उबाठा)-३७४, नोटा-२८, सर्व मिळून एकूण झालेले मतदान ४३ हजार २४७ पैकी स्त्री – २१ हजार २७४,पुरुष- २१हजार ९७२ व इतर १ असे झाले होते. अनेकांचा पराभव अगदी थोडक्या मताने झाला आहे.


