कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवार (दि.१२) रोजी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब रुईकर यांची निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले असून सोमवार (दि.१२) रोजी स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीत सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाळासाहेब रुईकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या निवडीबद्दल बोलतांना बाळासाहेब रुईकर यांनी सांगितले की, आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून कोपरगावकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी ज्या विश्वासाने मला स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करून नागरीकांच्या विकासाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपारी प्रयत्न करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले.


