शासकीय रेखाकला परीक्षेत आत्मा मालिकचे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांच्या राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगांव या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले. एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकने पटकवला.

रेखाकला परीक्षेसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील सात लाख वीस हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये आत्मा मालिकच्या 100 टक्के निकालाचे हे सलग 26 वे वर्ष असून आजपर्यंत 31 विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. प्रविष्ठ झालेले 980 विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी 514 विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, 356 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी, 111 विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी मिळविली आहे. स्मार्ट संण्डे, सुपर नाईट तयारी वर्ग, खास प्रशिक्षण शिबिरे व तज्ञ कला शिक्षकांचे मार्गदर्शन वर्ग यामुळे हे यश साकारल्याचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.

राज्य गुणवत्ता यादीमध्ये साक्षी गायकवाड राज्यात दुसरी, गुंजन शिंपी राज्यात सहावी, समृध्दी उधान राज्यात वीसावी, जयदीप काळे राज्यात 24 वा, ओेम पवार राज्यात 24 वा, कार्तिक ढवळे राज्यात 31 वा, आकाश लोखंडे राज्यात  32 वा, जय रसाळे राज्यात 32 वा, धनश्री रक्ताटे राज्यात 35 वी, स्नेहल गर्जे राज्यात 43 वा, श्रावणी इनामके राज्यात 55 वी, अथर्व सानप राज्यात 56 वा, यश सोनवणे राज्यात 68 वा, निधी बोरावके राज्यात 73 वी, अभिमन्यू मारने राज्यात 74 वा, नलिनी लोहकरे राज्यात 75 वी यांनी स्थान मिळविले.

 या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख मिना नरवडे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, अनिल सोनवणे, सचिन डांगे, बाळकृष्ण दौंड, पर्यवेक्षक सुनिल पाटील, नितीन अनाप, नयना अदमाने, गणेश रासने, कलाशिक्षक मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, सुमित मोरे, प्रसाद करडे, विष्णू ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मिरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे आदिंनी अभिनंदन केले.

Leave a Reply