संजीवनी सैनिकी स्कुलच्या बॅंडपथकाच्या धूनवर आमदार काळे मंञमुग्ध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगावच्या गोदाकाठ महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नागरीकांच्या गर्दींने विक्रम केला आणि गोदाकाठ उत्सव लक्षवेधी ठरला माञ या विक्रमी गर्दीत संजीवनी सैनिकी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वाजवलेला बॅंड अधिक लक्षवेधी ठरला आणि संजीवनी सैनिकी स्कुलच्या मुलांनी अप्रतिम धुनमध्ये बॅंड वाजला अन संपूर्ण गोदाकाठ उत्सवच गाजवला. संजीवनी सैनिकी स्कुलच्या ८ वी व ९ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २९ शाळकरी मुलांनी खास शैलीतील सैनिकी वर्दीतून बॅंड वाजवला त्यातही देशभक्तीपर गितांची धून अतिशय लक्षवेधणारी  व देशभक्तीचीउर्जा अंगात आणणारे हे संगित होते त्यामुळे खुद्द आमदार आशुतोष काळेहे अतिशय मंञमुग्ध झाले होते.

पहील्या पाण्यापासून तेशेवटच्या क्षणापर्यंत आमदार आशुतोष काळे हे  संजीवनीच्या लहन शाळकरी मुलांच्या मुखातून येणाऱ्या आवाजाची धून बारकाईने एकुण परिक्षण व निरीक्षण करीत होते तर त्यांच्या बाजुला बसलेले संजीवनी शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त सुमित कोल्हे हे आमदार काळे यांना  बॅंड पथकाच्या कौशल्याची माहीती देत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालीका चैताली काळे व सुमित कोल्हे यांनी बॅंड पथकातील सर्व विद्यार्थ्यांचे खास शैलित अभिनंद करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

या बॅंडपथकाचे प्रशिक्षक महेश गुरव यांनी बॅंड पथकातील मुलांच्या कारकिर्दीचा परिचय करून देताना म्हणाले की, अवघ्या दोन वर्षात संजीवनी सैनिकी स्कुलच्या मुलांनी  बॅंडपथाकाची सुरुवात करून दिल्लीचे तख्त वाजवून गाजवले आहे. राज्यातील सर्वच सैनिकी स्कुलच्या बॅंडमध्ये संजीवनीचा बॅंडपथक अव्वल ठरला आहे आता राज्याचं नेतृत्व संजीवनी करीत आहे यासाठी संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे असे सांगितले.

 यावेळी विश्वस्त सुमित कोल्हे म्हणाले की, संजीवनी सैनिकी स्कुलच्या मुलांनी गोदाकाठ महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॅंड वाजला त्यामुळे उपस्थितांना समजले की, सैनिकी स्कुलचा बॅंड पथक कसा आहे, पण ती तर फक्त झलक होती. खर तर संजीवनी स्कुलचा बॅंड पथक राज्यात प्रथम क्रमांकाने गौरवलेला आहे. आता  देशभरातील सैनिकी सवकुलमध्ये तो अव्वल ठरला आहे. येत्या २६ जानेवारीला संजीवनी सैनिकी स्कुलच्या मुलांनी वाजवलेला बॅंड दिल्लीच्या चारही दिशांमध्ये घुमणार आहे. देशातील चार दिशाचे विभागनिहाय बॅंडपथके दिल्लीत येणार आहेत त्यामध्येही आपण अव्वल असणार असुन  लष्कराच्या तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख संजीवनी सैनिकी स्कुलच्या मुलांनी वाजवणाऱ्या बॅंडचे परिक्षण करून २६ जानेवारीच्या  दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाला परेडची संधी मिळाली असल्याने  हि बाब संपूर्ण राज्यासह देशासाठी अभिमानाची व गौरवाची आहे याचा  आम्हाला  मनस्वी आनंद आहे.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रयत्नातून संजीवनी सैनिकी स्कुलची स्थापना झाली ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना सैनिकीचे प्रशिक्षण देवून देशसेवेसह नोकरीची संधी देण्याचे कार्य केले त्यांचा वारसा पुढे घेवून जाताना आधुनिक काळाची जोड देत नवनव्या उपक्रमातून हि सैनिकी स्कुल आज देशात अव्वल ठरत आहे त्याचाच भाग हा बॅंड पथक होय. सैनिकी स्कुलच्या मुलांबरोबर मी स्वतः मैदानात उतरून विविध कसरती करून घेत असल्याने संजीवनी सैनिकी स्कुलचा विद्यार्थी अभ्यासासह  मैदानी खेळात तसेच विविध कलांमध्ये कुठेच मागे नाही.याची अनुभुती काल गोदाठ महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कोपरगावकरांनी अनुभवली असेही ते म्हणाले.

 दरम्यान गोदाकाठ महोत्सवात  हजारो बचत गटाच्या महीलांसाठी बाजार पेठ उपलब्ध झाल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील महीलांसाठी व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी प्रियदर्शनी स्वयंसहाय्यता महीला बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पाताई  काळे व चैताली काळे यांच्या पुढाकारे उपलब्ध झाल्याने चार दिवसात कोट्यावधीची उलाढाल येथे झाली. कोपरगाव  तालुक्यात काळे कोल्हे यांनी जसा सहकार रूजवला आणि वाढवलातसेच काळे कोल्हे यांनी सर्वसामान्य गरीब व होतकरू महीलांना एकसंघ करून सर्वाधिक बचत गटांची निर्मिती केली.

केवळ बचत गट काढले नाहीत तर त्या बचत गटांना अर्थसाहाय्य देवून सक्षम केले. आज अनेक महीला बचतगटांच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार करुन नवनवीन व्यवसाय निर्माण करीत आहेत. बचत गटामध्ये कोपरगाव तालुका जिल्ह्यात अव्वल करण्याचे काम काळे कोल्हे यांनी केले. त्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे , पुष्पाताई काळे, चैताली काळे व रेणुका कोल्हे यांचे योगदान अधिक आहे.  सहकारी संस्था व बचत गटामध्ये  काळे कोल्हे यांनी कधीच राजकारण केले नाही. म्हणुनच कोपरगावमध्ये सहकारी स खर कारखाने टिकून आहेत व महीला बचत गटांची संख्या लक्षणिय आहे. 

Leave a Reply