पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० जानेवारी पर्यंत मुदतवाढ – आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने सात नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज अद्याप भरलेले नाही त्या शेतकऱ्यांनी आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

मागील आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची व लाभधारक शेतकऱ्यांची आ.आशुतोष काळे यांनी विविध प्रश्नाबाबत कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर बैठक घेतली. यावेळी या बैठकीत रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्याची मुदत ०६ जानेवारी रोजी संपली असून काही शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज भरणे बाकी असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरलेले नाही अशा लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर अर्ज भरण्यासाठी २० जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रब्बी हंगामात पिकांना पाण्याची कमतरता भासू नये व एकही लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू नये यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप जे लाभधारक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले नाहीत त्या लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज २० जानेवारी पर्यंत संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

Leave a Reply