विवेक कोल्हे हे कार्यकर्त्याला ताकद देणारे शक्तीकेंद्र – जितेंद्र रणशूर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात सामाजिक समावेशकतेचा नवा अध्याय कोल्हे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली लिहिला जात असून, हक्काचा नेता हा आपल्या हक्कासाठी ही केवळ घोषणा न राहता कृतीतून सिद्ध होत आहे, असे मत नवनियुक्त उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी व्यक्त केले. सेवा हाच धर्म ही कोल्हे कुटुंबाने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची घेतलेली भूमिका सर्व स्तरात कौतुकाचा विषय ठरत असल्याचे ते म्हणाले.

कोल्हे कुटुंबाच्या सर्वसमावेशक व न्याय्य कार्यपद्धतीबद्दल बोलताना रणशुर म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मागासवर्गीय समाजातील रमेशराव घोडेराव यांना कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी संधी देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना सह्यांचे अधिकार देण्यात आले असून, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. हीच परंपरा पुढे नेत मला उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, याचा अभिमान वाटतो.

सहकार व नगरपालिका क्षेत्रात या पदांसाठी कोणतेही आरक्षण नसतानाही समाजातील कार्यकर्त्यांना संधी देणे, ही कोल्हे कुटुंबाची दूरदृष्टी दर्शवते. कोपरगाव नगरपालिकेच्या ७८ वर्षांच्या इतिहासात दलित समाजातील केवळ चार व्यक्तींना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, त्या सर्व संधी कोल्हे कुटुंबाच्या माध्यमातूनच मिळाल्या, हे वास्तव आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८५ मध्ये बाळाभाऊ शिंदे उपनगराध्यक्ष, १९९८ मध्ये सौ. सिंधुताई साहेबराव कोपरे व श्री. प्रकाशराव शिंदे, तसेच २०११ मध्ये सुरेखा विनोद राक्षे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या.

यावेळी युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही जबाबदारी मिळाली, याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

२०११ नंतर पालिका इतिहासात हा पहिला ‘सिक्सर’ असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दुसरा आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे यांना आमदार करून तिसरा ‘सिक्सर’ मारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

५० दिवस चाललेल्या पालिका निवडणुकीत विवेक कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबाने दिवसरात्र कार्यकर्त्यांची काळजी घेतली. ऊर्जा देणारे, अभ्यासू व दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांचा विशेष आदर वाटतो. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट निश्चित होईल, असा विश्वास रणशुर यांनी व्यक्त केला. या विजयासाठी प्रभागातील सर्व मतदार, भाजपचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक व मित्रपरिवाराचे रणशुर यांनी विशेष आभार मानले.

Leave a Reply