वैशालीताई वाजे यांनी साठवण तलावावर स्वीकारला पदभार – नगराध्यक्ष संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती म्हणून वैशालीताई वाजे यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत सकारात्मक, श्रद्धायुक्त व आदर्शवत पद्धतीने केली. कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलपूजन करून त्यांनी पदभार स्वीकारला. ज्या तलावांमधून व जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरवासीयांना पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची सुरुवात करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे मत नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष संधान पुढे म्हणाले की, एक भगिनी आपल्या जबाबदारीची सुरुवात करताना इतक्या आदर्श पद्धतीने पुढाकार घेत आहे, हे नागरिकांप्रती असणाऱ्या त्यांच्या प्रामाणिकतेचे व कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे. पाणीपुरवठा हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे याची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे.

या प्रसंगी कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील साठवण तलावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. त्यानंतर कोपरगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्राचीही सखोल पाहणी करण्यात आली.

नुकतीच पूर्ण झालेली दुरुस्ती, यंत्रणा व शुद्धीकरण प्रक्रिया तपासण्यात आली. विशेष म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रातून येणारे पाणी नगराध्यक्षांनी स्वतः पिऊन त्याची प्रत्यक्ष तपासणी केली. या केंद्रामार्फत शहरवासीयांना सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असा विश्वास संधान यांनी व्यक्त केला.

वैशालीताई वाजे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामाची सुरुवात अशा अनोख्या व प्रेरणादायी पद्धतीने केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी विशेष कौतुक केले. तसेच युवानेते विवेक कोल्हे यांनीही वैशालीताई वाजे व विजयराव वाजे यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, पाणीपुरवठा सभापती वैशालीताई वाजे, विजयराव वाजे, अनिताताई गाडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply