कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू पिढी घडू शकणार आहे. लहान वयातच योग्य वातावरण, सुरक्षित इमारत आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळते. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज असून दर्जदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव मतदारसंघातील डाऊच बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलीच्या कामाचे भूमिपूजन तसेच अंगणवाडी शाळेच्या खोलीचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शुक्रवार (दि.२३) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अंगणवाडीच्या नवनिर्मित खोलीमुळे माता-पालकांचीही चिंता कमी होणार असून लहानग्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि पोषक वातावरणात शिक्षण व संस्कार मिळणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.लहानग्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तीनही घटकांवर भर देत विकासकामे सातत्याने राबवली जातील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी ह.भ.प. मनसुख महाराज दहे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, धर्मा दहे, भिवराव दहे, बाजीराव होन, सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच संजय ढमाले, डाऊच खु.चे सरपंच संजय गुरसळ, शिवाजी दहे, जयवंत दहे, सुनिल बढे, गोरख दहे, रामनाथ जाधव, बापू दहे, अक्षय दहे, योगेश दहे, बाबासाहेब होन, संजय गायकवाड, तुळशीराम दहे, भाऊसाहेब दहे, देवेंद्र दहे, दगु गायकवाड, केशव बढे, काशिनाथ दहे, दादासाहेब दहे, भाऊसाहेब दहे, पोपटराव दहे, रामदास दहे, गणेश दहे, कैलास पवार, मच्छिंद्र ढमाले, कांतीलाल दहे, पन्नालाल दहे, बाळासाहेब दहे, संकेत दहे, किरण पवार, विलास चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


