‘शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या बाबत केलेल्याआक्षेपार्ह विधानाबद्दल शेवगावात आ. रामदास कदमांचा युवा सेनेने जाहीर निषेध केला. या वक्तव्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ अटक करावी तसे न केल्यास शेवगाव तालुका युवा सेना व सर्व अंगीकृत संघटना मोठे आंदोलन उभे करून सरकारला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा येथील युवा सेनेने दिला आहे. या संदर्भाचे निवेदन शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांना आज देण्यात आले.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख शितल पूरनाळे म्हणाले , वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. त्याच प्रमाणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री असून त्यांच्या व आदित्य ठाकरेच्या विरोधात कदम यांनी घाणेरड्या पद्धतीने विधान केले . असे वक्तव्य युवा सेना कधीच सहन करणार नाही. कदमावर कारवाई झाली नाही तर युवा सेना रस्त्यावर उतरेल. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाने त्यांना तात्काळ अटक करावी.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख पूरनाळे, तालुका उपसंघटक साई भागवत, महिला आघाडी विधान सभा संघटक पुष्पा गर्जे आदिंची भाषणे झाली. जेष्ठ शिवसैनिक एकनाथ कुसळकर, युवा सेना शहर प्रमुख महेश मिसाळ, तालुका संघटक महेश पूरनाळे, अक्षय बोडखे, किरण मगर, सोनल वाघमारे, दादा रसाळ, रमेश पाटील, अप्पू लाड, समीर शेख, संतोष हवाले, राहुल सोनवणे, महेश लातूरकर, माउली धनवडे, विकास भागवत, महेश मारकड, राजू काळे, शिवराज बोडखे, दिगंबर शिंदे, प्रदीप खाटिक, उद्धव पूरनाळे, दिलीप साळुंके, कमल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.