बाधीत व्यक्तींची प्रकृती धोक्याबाहेर
कोपरगाव प्रतिनिधी दि.३० : नवराञौत्सवात बहुतांश महीलांना भगरीच्या पिठामुळे झाली विषबाधा भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्याने कोपरगाव तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल २२ महीलांना विष बाधा झाल्याने तालुक्यातील दुकानदांनी आपल्या दुकानातील भगरीचे पिठ गायब करुन आमचा याच्याशी काही संबंध नाही या अविर्भावत बसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, भगरीच्या पिठापासुन तयार केलेल्या भाकरी खाल्याने अनेक महीलांना विष बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी येथे आणण्यात आले होते. बाधीतांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या जुलाब होणे असा शाररीक ञास जाणवत होता. या विष बाधीतांवर तातडीने योग्य उपचार केल्यामुळे अनेकांची प्रकृती स्थिर झाली आहे.
आत्तापर्यंत शहरातुन ९ व्यक्तींना विषबाधा झाली होती त्यापैकी चौघांना उपचार करून घरी सोडण्यात आले तर सध्या ग्रामीण रुग्णालयात ५ महीलावर उपचार सुरू आहे. नागरीकांनी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने तसेच कालबाह्य झालेल्या भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या किंवा शिळ्या, अर्धवट भाजलेल्या भाकरी खाल्याने विषबाधा झाली असावी. तेव्हा दुषित भगरीच्या पिठाचे पदार्थ खाऊ नये. तसेच दुकानदारांनी दुषित भगरीचे पिठ नागरीकांना देवू नये असे आवहान डॉ. यादव यांनी केले.
दरम्यान तालुक्यातील वारी येथील ७ व्यक्तींना तर तळेगाव मळे येथील ६ व्यक्तींना भगरीच्या भाकरी खाल्याने विषबाधा झाली. बाधीत व्यक्तींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार केल्याने बाधीत रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप यांनी दिले.
ते पुढे म्हणाले या विषबाधीत घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहीती देताच संबधीत विभागाचे अधिकारी. राजेश बढे यांनी तालुक्यातील बाधीत ठिकाणी भेट देवुन ज्या दुकानातुन भगरीचे पिठ विक्री केली त्या दुकानदाराची व ज्या उत्पादकाने दुकानदाराला पिठ दिले त्यांची सखोल माहीती घेवून विक्रीला ठेवलेल्या पिठाचे नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे अशी माहीती दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बढे म्हणाले की, नागरीकांनी शिळे व बाधीत पिठ खाल्यामुळे हि विषबाधा झाली असावी. बाधीत भगरीचे पिठ उत्पादीत करुन विकणारे कोपरगाव येथील राजेश राठी यांच्या कारखान्याला भेट देवून त्यांचे ऊत्पादन बंद केले आहे. बाधीत पिठ विकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बढे यांनी सांगितले.
उपवासाच्या काळात भगरीच्या पाठाच्या भाकरी खाल्ल्या जातात माञ भगरीचे पिठ तयार करताना भगरीला आगोदर व्यवस्थित भाजुन घेवून दळावे लागते परंतु काही व्यापारी नफेखोरीच्या नादात योग्य पद्धतीने पिठ तयार केले जात नाहीत.काही उत्पादक जुन्या भगरीच्या तुकड्यापासुन पिठ तयार करुन बाजारपेठेत पुरवठा करतात. भगर खाल्याने कोणालाही विषबाधा झाली नाही पण भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्याने नागरीकांना ञास झाला अशी खंत कोपरगाव व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा यांनी व्यक्त केली.