कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : तालुक्यातील शिंगणापूर शिवारातील श्रीमान काशिनाथ दादा लोणारी कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यावर एका भिक्षेकरू महिलेचा दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर परिसरातील रेल्वे बोगद्याजवळ राजेंद्र लोणारी यांच्या मालकीचे कोपरगाव-वैजापूर रस्त्याच्या कडेला दोन मजली श्रीमान काशिनाथ दादा लोणारी नावाचे कॉम्प्लेक्स असून यात छोटे-मोठे गाळे आहे. यामध्ये उमेश निरगुडे यांचे आरुष मिल्क अँड आईस्क्रीम पार्लरचे दुकान भाडेतत्त्वावर चालवितात.
निरगुडे हे आपल्या नेहमीच्या वेळेनुसार आज सकाळी ८.३० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या शटर जवळच कोणीतरी प्रथमदर्शनी पांघरूण घेऊन झोपलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी त्याला दुरूनच आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु समोरून काही प्रतिसाद मिळत नव्हता यावेळी त्यांचे लक्ष अचानक आसपासच्या पायऱ्यावर गेले असता पायऱ्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा दिसला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना आवाज देत काही माणसे बोलावून त्यांना ती परिस्थिती दाखवली.
उपस्थितील नागरिकांनातून तत्काळ गावचे सरपंच सुनीता संवत्सरकर यांचे पती भीमराव संवत्सरकर यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली असता संवत्सरकर यांनी तत्काळ कोपरगाव शहर पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.
सदर ठिकाणची पाहणी सुरू केली असता सदरच्या सर्व कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे सडे आढळून आले तर चार-पाच छोटी दगड देखील रक्ताने माखलेली आढळून आल्याने भिक्षेकरू महिलेचा खून दगडाने ठेचून झाला की, अजून काही घातपात आहे ते पोलिसांच्या पुढील तपासातच उघड होईल.
महिलेचा मृतदेह आढळला तेथील आरुष मिल्क पार्लरचे मालक उमेश निरगुडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या दुकानाच्या बाहेर सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवलेला असून त्या कॅमेरामध्ये कैद झालेल्या दृश्यात एक अंदाजे 30 ते 35 वर्षीय पुरुष त्या मृत महिलेचे पाय धरून ओढताना दिसून येत आहेत तर त्या मृतदेहाची मान हलवत उठवण्याचा देखील प्रयत्न करत आहे तसेच तो त्या मृतदेहाजवळ पांघरून घेऊन झोपलेला दिसून येत आहेत तर परत काही वेळेने त्याला जाग आल्यानंतर उठून जाताना त्या मृतदेहावर पांघरून टाकून जाताना दिसून आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या आपली तपासाची चक्रे फिरवून मृतदेहची सखोल पाहणी करून सदर खुनाचा प्रकार असून त्या दिशेने तपास करत तेथील सि्सिटिव्हच्या फुटेज अभ्यास करून एका परप्रांतीय पुरुष संशयितास ताब्यात घेतले आहे.
ह्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिंगणापूर गावच्या पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 299/2022 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहे.