शहरातील ८२० विद्यार्थांचा रेखाकला ( ग्रेड चित्रकला) परीक्षेत सहभाग

Mypage

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात शासकीय रेखाकला परीक्षेचे यशस्वी आयोजन

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी घेण्यात येणारी शासकीय रेखाकला ( ग्रेड चित्रकला) परीक्षा बुधवार २८ सष्टेंबर ते १ ऑक्टोंबर या कालावधीत पार पडल्या. शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालय हे जिल्हातील सर्वात जुने रेखाकला केंद्र आहे.

Mypage

चित्रकला केंद्र क्रमांक १०८०९ या ठीकाणी शहरातील के.बी.पी.विदयालय, डॉ. सी.एम.मेहता विदयालय, शारदा इंग्लिश मेडीयम स्कुल, महर्षि विदयालय, सेवा निकेतन, संजीवनी सैनिकी स्कुल, संजीवनी अकेडमी, सोमय्या विदयालय, साकरवाडी, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडीयम आदी शाळेतील ८२० विदयार्थी सहभागी झाले होते.

Mypage

या परीक्षेचे संयोजन कलाशिक्षकए.बी.अमृतकर, ए.जे.कोताडे यांनी केले. विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहीले तर उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड व पर्यवेक्षिका श्रीमती यु.एस.रायते यांनी सहाय्यक केंद्र संचालक म्हणून काम केले.

Mypage

या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या  विदयार्थीना शालांत माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्यामार्फत अ श्रेणी मिळविणा-यांना ७ गुण व ब श्रेणी मिळविणा-या ५ गुण तर क श्रेणी मिळविणा-यांना ३गुण इतके वाढीव गुण मिळत असतात. त्यामुळे अलिकडे या परीक्षांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. अशी माहीती मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी दिली.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *