नाते संबंध अधिक दृढ करणारी विसपुते सराफ यांची दिनदर्शिका…
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : सोन्या चांदीचे दुकान म्हणंटले की, केवळ सोन्या चांदीच्या वस्तुंची खरेदी विक्री करणारे ठिकाण मग काही ठिकाणी सोन्याची शुध्दता तर काही ठिकाणी ग्राहकांचा विश्वास. माञ कोपरगाव येथील विसपुते सराफ यांच्याकडे सोन्याची शुध्दता आणि ग्राहकांचा विश्वास तर शंभर टक्के आहेच पण केवळ खरेदी विक्री पुरता मर्यादित नसुन तो ग्राहकांच्या कुटुबांतील प्रत्येक सदस्यांचे नातेसंबंध जोपासण्याचे कार्य विसपुते सराफ पेढीचे संचालक दिपक विसपुते व यश विसपुते यांनी केले आहे.
याचाच एक महत्वाचा भाग म्हणून त्यांनी ग्राहकांच्या नात्यातील नातेवाईकांची जोडी आपल्या दिनदर्शिकेचेच्या माध्यमातुन व्यक्त करीत अनोख्या नात्याची अनोखी दिनदर्शिका काढली आहे. नुकतेच विसपुते सराफ यांच्या अनोख्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पेढीतील कर्मचारी व ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. गुरु-शिष्य, पती-पत्नी, वडील-मुलगा, आईचे प्रेम या नात्यात एक विश्वास आहे. तिच संकल्पना घेत ग्राहकांशी असलेले अतूट नाते आणखी दृढ करत विसपुते सराफच्या पुढील वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन येथील विसपुते सराफ पेढीचे संचालक दिपक विसपुते यांनी केले.
विसपुते सराफ पेढीतील ग्राहकांच्या हस्ते सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंद दुध संघाचे माजी उपाध्यक्ष, संचालक राजेंद्र जाधव, सेंट्रल बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी भालचंद्र विभूते यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. प्रदीप दुसाने यांनी प्रास्ताविक केले.
विसपुते पुढे म्हणाले, पेढी चालू वर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यातून “नात्यांचा रौप्य महोत्सव” हि संकल्पना पुढे आली. सोन्याशी शुद्धता, पारदर्शक व्यवहार व ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य हे ब्रीद अखेरपर्यंत जोपासणार आहोतच. प्रत्येक महिन्याची दिनदर्शिका अतिशय अर्थपूर्ण केली असून शुद्ध नात्यातून ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करण्यास पेढी प्राधान्य देत आहोत. त्यातून आईचे प्रेम, पती-पत्नी मधील विश्वास, भावाचा बहिणीला आधार, बाप लेकीचा सहवास, नातवांसमवेत आजीची गोष्ट, मैत्रिणीची साथ, मित्राचा खांद्यावर हात, सुख दु:खातला शेजार, मामाचे लाड हि संकल्पना दिनदर्शिकेतून अतिशय सुरेखरित्या मांडण्यात आली आहे.
विसपुते सराफ यांनी व्यवसायातील बारकाव्या बरोबर ग्राहकांचा विश्वास संपाद करुन चोख व्यवहार आणि चोख सोन्याची शुध्दता जपल्यामुळे सोने खरेदीसाठी कोपरगावच्या दालनात ग्राहकांची गर्दी होते. आता शेजारच्या तालुक्या बरोबर शेजारच्या जिल्ह्यांतील ग्राहकांची पहीली पसंद विसपुते सराफ झाल्याने विसपुते यांच्या शुध्दतेची महती अधिक दूरवर पसरत आहे.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकाभिमुख योजना सातत्याने राबविण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारीमध्ये विसपुते सराफ पेढी दरवर्षी आपला खारीचा वाटा उचलत असते. त्यातून विद्यार्थीनीना ११ सायकलीचे वाटप करण्यात आले. पाच विद्यार्थीनी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहेत. रौप्य महोत्सवी वर्ष विसपुते सराफ पेढी ग्राहकांसमवेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणार आहे. – यश विसपुते, संचालक विसपुते सराफ पेढी, कोपरगाव