शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील राक्षी येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्नीक कॉलेज, या तंत्रनिकेतन आणि समर्थ प्रायव्हेट आय. टी. आय यांच्या संयुक्त विद्यमाने ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये शुक्रवारी (दि २८) कॅम्पस मुलाखतींद्वारे ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या कॅम्पसमध्ये टाटा मोटर्स, धूत ट्रान्समिशन, विकास ग्रुप, स्पेस ऑटोपार्टस, क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड या अग्रमानांकित कंपनीमध्ये त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. यामध्ये ढाकणे पॉलिटेक्निकचे ४४ विद्यार्थी, समर्थ आयटीआयचे २६ विद्यार्थी अशा ७० विद्यार्थ्यांची निवड झाली. गुणवत्तापूर्वक आणि विद्यार्थीभिमुख शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच नेमणूक पत्र मिळाले असून, ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी ढाकणे पॉलिटेक्नीक रोजगार निर्मिती केंद्र म्हणून कार्य करत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली. विद्यार्थीभिमुख विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव मिळून, त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून बदलत्या कालानुरूप स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची संधी हे त्याचाच परीपाक आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सचिव श्रीमती जया राहणे, समन्वयक ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य डॉ. आर. एच अत्तार, आयटीआयचे प्राचार्य संतोष आंधळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, अकॅडेमिक को ऑर्डीनेटर प्रा. सुनिल औताडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.राज गुजर, सिव्हील विभागप्रमुख प्रा. इर्शाद पठाण आदींनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .