शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील लाड जळगाव येथील माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हौसाबाई ताराचंद छाजेड यांचे ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अहमदनगर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. स्व. हौसाबाईनी दातृत्वाची भावना आखेर पर्यंत जपली. त्यांच्याच इच्छेनुसार त्याचे मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्यात आले. त्यांचा मुलगा प्रमोदकुमार छाजेद यांनी आईच्या सुचनेनुसार देहदानाचे सोपस्कार पार पाडले.
स्व. हौसाबाई यांचे पती स्व. ताराचंद छाजेड यांनी ही त्यांचे मृत्यू पूर्वी आपल्या जमिनीचे वाटप कुटुंबिय यांना करतांना सुमारे सहा एकर जमीन ग्राम वासियांना राहण्यासाठी दान दिली आहे. त्यांचे मागे ज्येष्ठ व्यावसायिक प्रमोद कुमार हे चिरंजीव, सून, नातवंडे असा परिवार आहे .