छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान – बिपीन गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहरातील महाराष्ट्र माझा न्युजचे संपादक बिपिन गायकवाड यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासात स्वार्थी राजकारण न करता निव्वळ मानव सेवे करिता अविरत समाजकार्य करणारे तसेच तथागत भगवान बुद्ध यांचा धम्म समाजातील तळागाळात पोहोचवण्याचे काम बिपिन गायकवाड हे करत आहे. पत्रकारिते सोबतच ते श्रामणेर बौध्दाचार्य असल्यामुळे ते धम्म कार्य करत गोरगरीब समाजासाठी देखील कार्य ते करत असतात.

या सर्व बाबींची दखल घेऊन सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व श्रीसाई वासल्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने २०२३ चा छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार पत्रकार बिपिन गायकवाड यांना सिन्नर येथील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात शाही समारंभात शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी माननीय लखुजी राजे जाधव शिंदखेड राजा यांचे १६ वे वंशज माननीय शिवाजीराजे जाधव तसेच खर्ची आश्रमाचे १००८ महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती महाराज तसेच धम्म लिपी अभ्यासक छाया धर्मदत्त पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक सरदार विजय काकडे पाटील श्री साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रत्नाताई चांदगुडे तसेच सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिपीन गायकवाड यांनी पत्रकारितेची पदवी घेऊन महाराष्ट्र माझा न्युज चे संपादक म्हणून ते कार्यरत असून तसेच दैनिक महाभारत चे कोपरगाव तालुका प्रतिनिधी म्हणून ते काम करतात तसेच ‌निष्पक्ष समाज कार्यावर त्यांचा भर असून स्वतःला राजकीय पक्षासोबत गुंतवून न घेता समाजातील गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सरकारी दरबारी आपल्या लेखणीतून आवाज उठवून गोरगरिबांची कामे निस्वार्थ भावनेने मार्गी लावतात म्हणून समाजसेवेचे काम करताना तन मन धनाने समाजसेवा करीत असतात.

तसेच संविधानाने दिलेले अधिकार सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे ते पुरस्कर्ते आहेत व त्यानुसार मित्रमंडळींच्या सहकार्यातून त्यांचे अविरतपणे निस्वार्थ कार्य सुरू असते. त्यांच्या यशस्वी कार्याच्या यशाचे श्रेय ते आपल्या आई सुशिला वडिल चंद्रभान व पत्नी कविता यांना देतात तसेच त्यांना नुकताच छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे बिपीन गायकवाड यांचे सर्व नातेवाईक गणगोत्र हितचिंतक वाचक व मित्रमंडळीन कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.