कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०६ : प्रगती करावयाची असल्यास, विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून, भरपूर वेळ स्वयं-अध्ययन करणे, गरजेचे आहे. त्याच्याबरोबर साईबाबांचा श्रद्धा सबुरीचा अवलंब करावा लागेल, तर आपल्याला यशाचा मार्ग सापडेल, असे मत विजय शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेज कोऱ्हाळे येथील ११ वी विज्ञान मधील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ कामिनी शेटे, भारत शेटे, रविंद्र चौधरी, सुरेश गमे, देवीदास दळवी, महावीर शिंगवी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्नील लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, रियाज शेख, रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, प्रवीण दहे, प्रियंका चाफेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बापू पुणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपप्राचार्य प्रवीण दहे यांनी श्री गणेश पॅटर्न समजावून सांगितला तर प्राचार्य रियाज शेख यांनी शैक्षणिक संकुलाचे नियमावली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मुस्कान मनीयार, साक्षी शिंदे, समाधान गुडघे, कुणाल चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच परमितसिंग पोथीवाल, दिव्या हाळनोर यांना शैक्षणिक प्रगती बाबत व ऋषभ रहाटळ, दिपाली गुंजाळ, साई उदावंत या विद्यार्थ्यांना क्रीडा विभागातील कामगिरीबद्दल, शैक्षणिक संकुलातर्फे शैक्षणिक फी मध्ये ५० % शिष्यवृत्ती देण्यात आली. या वेळी इतर सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश फटांगरे, सागर हिंगे, सुनील गोर्डे, आहेर नंदलाल, अमोल कोतकर, सय्यद साहिल, पूजा चांदगुडे, ऋषिकेश आंत्रे, गौरव लहामगे, अमर शेख, बाजीराव जावळे, योगेश पगारे, गणेश उपाध्ये, सचिन भोसले, ऋषिकेश निर्मळ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा चांदगुडे, रोहिणी घोरपडे, अभिलाषा कडू यांनी केले.
उच्च प्रतिचे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण देणे ही आमची नैतिक जबाबदारी असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून शैक्षणिक संकुलात संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ५० गुणवंत विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, वसतिगृह देण्याचा मानस आहे. – प्रा. विजय शेटे, अध्यक्ष श्री गणेश शिक्षण संस्था