कोपरगाव प्रतिनिधी, दि.२०: शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे संपन्न होत असल्याने देवीच्या दर्शनासाठी न चुकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त दर्शन घेण्यासाठी जात असतात व जाताना एक वेगळीच ऊर्जा आपल्या सोबत घेऊन जातात या यात्रा उत्सवाच्या दरम्यान त्यांच्या आरोग्याला काही धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परमपूज्य आत्मा मालिक गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर यादरम्यान भव्य सर्व रोग निदान व नेञ तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
दैनंदिन जीवनात भक्तांना अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यांचा धोका लक्षात घेवून भक्तांना प्रवासात दरम्यान आरोग्याचा कोणताही धोका होवू नये म्हणून आत्मा मलिक हॉस्पिटल तर्फे रुग्णवाहिका सेवाही या शिबिरामध्ये मोफत देण्यात आली आहे. आत्मा मालिक हाॅस्पिटलच्या या अभिनव उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
केवळ आरोग्य तपासणी शिबिर न करता भक्तांसाठी लागणारे सर्व औषधे मोफत देण्याची व्यवस्था करुन आत्मा मालिक हाॅस्पिटलच्या वतीने माणुसकीचे नवे दर्शन घडवले आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या भूमित आत्मा मालिक यांच्या सानिध्यात राहुन आरोग्याची सेवा मोफत मिळत असल्याने अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आत्मा मालिक ध्यानपिठ जंगली महाराज आश्रय ट्रस्चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आत्मा मालिक माऊलींचे विचार हे जनसेवेचे आहेत तेच विचार प्रत्यक्षात कृतीत आणण्याचे काम नंदकुमार सुर्यवंशी हे करीत आहेत त्यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजनेचा विस्तार भाविक भक्तांसाठी वाढवण्यात आलेला आहे.
आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजनेची माहिती देखील भाविकांना या शिबिरात दिली जात आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. जर काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर जनसंपर्क अधिकारी अक्षय कंड्रे यांच्याशी ९१५६०३३२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही ते म्हणाले.