शेवगाव प्रतिनिधी, दि . ५ : शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८२.२0 टक्के मतदान झाले.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण ५६ हजार ८३४ मतदारापैकी एकूण ४६ हजार ६१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंदिस्त केले.
सकाळी ७.३० ला मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० पर्यंत पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग कमी होता. दुपारी मतदानाचा वेग सुधारला. दुपारी ३.३० ला ७१.७४ टक्के मतदान झाले. तालुक्यात ८२.२ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे, परिविक्षाधिन तहसीलदार राहूल गुरव यांनी दिली. सर्व ठिकाणी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे – आव्हाणे बु ॥ २६२० पैकी २३ १७ मतदान ८ ८ . ४१ टक्के, बहाणपूर -५ ३१ पैकी ५०६ ( ९५ .२९ टक्के सामनगाव -१६०८ पैकी १२०९ ( ७५.१८ टक्के ) लोळेगाव ६ १६ पैकी ५ ५ ८ ( ९०.५ ८ टक्के )
वडुले बु ” २ ४७१ पैकी २१६ २ ( ८७ . ४९ ‘ भागवत एरंडगाव – ८८ ७ पैकी ८३१ ( ९३.१८ ) लाखेफळ ५९१ पैकी ५ ३२ ( ९०.१ ० )
थाटे -१० ५६ पैकी ९४ ६ ( ८९५८) लाडजळगाव – ४४०१ पैकी ३३३६ ( ७५.८ ०) दिवटे – ७६२ पैकी ६६५ ( ८७.२ ७ ) मुंगी -४८४० पैकी ३ ५३६ ( ७३.०५ ) वरुर बु – ३३९३ पैकी २७६३ ( ८१.४३) भगूर-१२६२ पैकी १०८९ ( ८६.२८ )
गोळेगा व १५१६ पैकी १३४ १ ( ८८.४५ ) मडके -९१७ पैकी ८०९ ( ८८.२२) खडके – ७५८ पैकी ६६६ ( ८७.६६ ) बालम टाकळी -४४७३ – ३६४८ (८१.५६) बोधेगाव – ६८८२ – पैकी ५३१४ ( ७७.२२ ) कन्हेटाकळी -१४६५ – पैकी १०९२ (७४.५३ ) हिंगणगावने ११०७- १०२५ ( ९२.५९) दोरसडे आंत्रे – १२०७ पैकी १०१४ ( ८४ ) शहरटाकळी – ३५३८ पैकी २८८१ ( ८४ .५०) देव टाकळी २३९२ पैकी २०२२ ( ८४.५ ३) खरड गाव -२४१७ – पै की २०२६ ( ८३.८२ ) वडुले खु . २२६१ पैकी १८५१ ( ८१ .८५) समसुद एरंडगाव -१ ७११ पैकी १५२३ ( ८९.१ ) शेकटे खु. ६७९ पैकी ५८५ ( ८६.१५ ) रावतळे कुरुडगाव (एका जागेची पोटनिवडणूक ) ४७३
ग्रामपंचायत निवडणूक पार पडणाऱ्या गावात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे सर्वत्र उत्सहाने मतदान झाले. पोलीस पथकास होमगार्ड जवानांनी बंदोबस्तासाठी सहाय्य केले. उद्या सोमवारी सकाळी दहाला मतमोजणी होणार असून यंदाच्या निवडणुकीत गावचे सरपंच पद हे जनतेतून निवडले जात असल्याने जवळपास सर्वच ठिकाणी सरपंच पदासाठी अनेकानी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे गावच्या सरपंच पदावर कोण विजयी होणार? याबाबत संबधित गावासह तालुक्याचे लक्ष राहिले आहे.