कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅड वर आगमन झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावन कुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहे.