शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : आयोध्येतील श्री प्रभूरामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रित, म्हसणजोगी समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा लातूर जिल्ह्यातील चाकूर चे सरपंच लक्ष्मण गोविंद मुकुट मोरे यांचा शेवगावातील रामनगरमध्ये म्हसणजोगी समाजाचे राज्याध्यक्ष
पोषण्णा कडमिंचे यांचे हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी अंकुश शेंडरे, केशव मामडे, अंकुश कडमिंचे, बालाजी शेनुरे, मादू मामडे, बालाजी मुकटमोरे, अशोक शेनुरे, व्यंकट शिंदे, हनुमंता मामडे, रामा शेनुरे, दिलीप कडमिंचे, सखाराम शेंडरे, शिवराम शिंदे आदि समस्त म्हसण जोगी समाज बांधव उपस्थित होते.

