शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदारसंघात अडीचशे कोटीचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी आला. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ७० कि. मी. रस्ते मंजूर झाले. असून तीन राज्यमार्गांच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यांनाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यातील विविध गावातील विकास कामाचे उद्घाटनानंतर भातकुडगाव येथील भातकुडगाव-नजन वस्ती ते भायगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण सुधारणा करणे कामासाठी दोन कोटी रुपयाचे कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांचे हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची संवाद साधताना त्या बोलत होत्या.
या पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. शाम काळे यांनी भातकुडगावचा काही वर्षापासून बंद पडलेला पशू वैद्यकीय दवाखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी ग्रामस्थाच्या वतीने केली.
यावेळी कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापुसाहेब भोसले, बापुसाहेब पाटेकर, वाय. डी. कोल्हे, ताराचंद लोढे, भीमराज सागडे, मुसाभाई शेख, लक्षमण काशिद, संदिप खरड, रामदास बडे, महादेव पवार, संतोष आढाव आप्पासाहेब सुकासे, सुभाष बडधे, नवनाथ फासाटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन रमेश कळमकर यांनी केले. तर डॉ. काळे यांनी आभार मानले.