कै. रखमाबाई आहेर यांचे निधन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ :  तालुक्यातील येसगांव येथील श्रीमती रखमाबाई दशरथ आहेर (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी वसंत भिमाजी थोरात यांच्या त्या सासु होत्या.

त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.