दधनेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी हभप सुदाम महाराज आदमाने

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : दहिगाव- ने  येथील श्री दध्नेश्वर शिवालयाचे मठाधिपती वै. ह भ प गुरुदास नवनाथ महाराज काळे यांना  देवगड संस्थांनचे मठाधिपती ह भ प गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज,ह भ प .पद्माकर महाराज पाटोळे, ह भ प देविदास महाराज म्हस्के, हभप नरसिंग महाराज तसेच माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले पाटील, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, डॉ. क्षितीज घुले तसेच राज्यातील विविध ठिकाणाहून आलेला कृष्णदेव बाबांच्या भक्त परिवाराच्या व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात गुरुदास वैकुंठवासी ह भ प नवनाथ महाराज काळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

     या प्रसंगी गाथामूर्ती हभप रामभाऊ महाराज राऊत (विठ्ठल आश्रम गंगापूर ) बाबांच्या संमतीने त्यांच्याच आश्रमातील अध्यापक हभप सुदाम महाराज आदमाने यांची दध्नेश्वर शिवालयाचे मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. गुरुवर्य भास्करगिरि महाराज यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हभप सुदाम महाराज आदमने हे यापुढे उत्तराधिकारी म्हणून आश्रमाचे कामकाज पाहतील असे घोषित करून या धर्मकार्यात सर्वांनी त्यांना आपले लेकरू समजून सहकार्य करावे.

सहकार महर्षि लोकनेते मारुतरावजी घुले पाटील व शांतीब्रह्म कृष्णदेव महाराज काळे बाबा यांच्या रूपाने भक्ती शक्तीचा समन्वय साधला गेला तोच वारसा यापुढेही घुले पाटील परिवार असाच चालवतील यात शंका नाहीअशी अपेक्षा व्यक्त केली. नरेंद्र पाटील घुले यांनीही स्व. घुले पाटील व वै. कृष्णदेव महाराज यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. तीच परंपरा आम्ही सर्व मिळून जोपासू अशी ग्वाही यावेळी दिली.

शेवटी हभप सुदाम महाराज आदमाने यांनी उत्तराधिकारी म्हणून मी आपणा सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य घेऊनच आश्रमाची सेवा व वृद्धी करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.