शेवगाव प्रतिनिधी, दि. २६: आज बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक तासभर शेवगाव परिसराला पावसाने जोरदार झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिक मंडळी आनंदीत झाली आहे.
या भागात खरिपाच्या कपासी, तूर, मुग, सोयाबीन, उडीद या पीकाच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग दुबार पेरणीच्या भितीने चिंताग्रस्त झाला होता. मात्र आजच्या पावसाने किमान दहा किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांची ही चिंता मिटली असून पाऊस येता झाल्याने सर्वच जण उल्हसीत झाले आहेत. या पावसाने शहरातील गटारी तुडूंब भरून रस्त्यातून वाहू लागल्याने रस्त्याला पाटाचे स्वरूप आले.