कारखान्याच्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान – आमदार काळे

काळे कारखान्यातील ३६ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम दिले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नव्हे तर राज्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने केलेल्या प्रगतीतून नावलौकिक वाढविण्यात यश मिळविले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे देखील मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ३६ कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, उद्योग समूहाच्या सेवेतून निवृत्त होत असतांना हा निरोप समारंभाचा कार्यक्रम काहीसा भावनिक असला तरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या निस्वार्थी सेवेचा गौरव आहे. जाणा-याला निरोप देणे हा फक्त शिष्टाचार नाही तर तो आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी निरोप हा नेहमी परक्या व्यक्तीला दिला जातो. 

परंतु आपण सर्वांनी आपले आयुष्य या उद्योग समुहासाठी झिजविले आहे. आपण सर्व या उद्योग समूह व काळे परिवाराचे सदस्य होता आणि यापुढेही राहणार आहात.आजवर कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्यावर अतोनात प्रेम केले ते प्रेम मलाही मिळाले ते मी माझे भाग्य समजतो. आपले सर्वांचे कारखाना, उद्योगसमूह व काळे परिवारावर असलेले प्रेम यापुढेही असेच अबाधित ठेवून आनंदी जीवन व्यतीत करा व आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

                 या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे, व्हा. चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले,राजेंद्र घुमरे, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने,गंगाधर औताडे, गोदावरी केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांचेसह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवारातील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणकुमार चंद्रे यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र  बर्डे यांनी मानले.