शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या ८ जुलै रोजी होणाऱ्या २२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ९ जुलैला शेवगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या प्रत्येक गणात स्वर्गीय मारुतराव घुले पाटील फाउंडेशनच्या वतीने,” घुले पाटील शालेय युवा ” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध तसेच चित्रकला अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांसाठी घसघशीत पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या सदर्भात माहिती फाउंडेशनचे समन्वयक पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी दिली.
वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी, ‘माझी आई माझी शाळा ‘, ‘ माझा आवडता प्राणी ‘ , ‘ मी पंतप्रधान झालो तर .. ‘ ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ भारत माझा देश आहे ‘ व ‘ राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ‘ हे स्पर्धेचे विषय असून पंधराशे एक रुपयांचे प्रथम, एक हजार एक रु. द्वितीय, ५oo रुपयाची तृतीय याशिवाय २०१ रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत.
इ. पाचवी ते आठवी गट क्रमांक दोन साठी ‘ पर्यावरण रक्षण काळाची गरज ‘ सावित्रीबाई फुले , माझा आवडता लेखक , पाणी आडवा पाणी जिरवा , साक्षरतेचे महत्व, ग्रंथ हेच गुरु व आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय मारुतराव घुले पाटील हे विषय असून पंधराशे एक रुपयाचे प्रथम , एक हजार एक रु चे द्वितीय, ७०० रुचे तृतीय तसेच २०१ रुपयाची उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत .इ नववी ते बारावी गट क्रमांक तीन साठी, ‘असा असावा माझा देश, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्याची ७५ वर्षे, बाप माझा शेतकरी, आदर्श राजकारणी लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील, तसेच मोबाईल शाप की वरदान हे विषय असून दोन हजार एक रुपयाचे प्रथम ., पंधराशे एक रु चे द्वितीय . १०१ रु .चे तृतीय . याशिवाय तीनशे एक रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत.
चित्रकला स्पर्धेसाठी ही असेच तीन गट असून निसर्ग चित्र, माझा आवडता खेळ, आकाश कंदिल, ग्राम स्वच्छता करणारी मुले, विदूषक, आवडते कार्टून , छोटा भीम, डोरेमॉन इतर कोणतेही फुलदाणी, माझा आवडता सण, हे स्पर्धेचे विषय असून प्रत्येक गटात विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी चित्र काढून रंगून आपल्या शाळेत जमा करायचे आहे. शाळेतून चित्रे स्वीकारली जातील. चित्र स्वतःच्या हातांनीच काढलेले असावे. वकृत्व स्पर्धेत बोलण्यासाठी पाच मिनिटे वेळ दिला जाणार आहे. शालेय युवा महोत्सवाच्या वतीने आयोजित युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.