जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांनी शिष्यवृत्ती योजनांबाबत गांभीर्याने काम करावे – शिक्षणाधिकारी बुगे

शेवगाव प्रतिनिधी, दि.११ : शिक्षण विभागाच्या मार्फत विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व अनेक शैक्षणिक सवलतीच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या जनजागृतीसाठी व प्रस्तावासाठी लागणा-या बाबींची पुर्तता करण्यासाठी तालुकानिहाय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र विदयार्थ्यांना पर्यंत या योजनांचा लाभ पोहचवणे शक्य होणार आहे. जिल्हयातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांनी योजनांबाबत गांभीर्याने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे योजना विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले.

शेवगाव येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलामध्ये शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजनांची जनजागृती आयोजीत कार्यशाळेमध्ये बुगे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे योजना विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय सरवदे, माध्यमिकचे विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, माध्यमिकचे विस्तार अधिकारी रवींद्र थोरात, जिल्हा स्काऊट संघटक अरुण पेशकार, जिल्हा गाईड संघटक सोनाक्षी तेलंगे, समाज कल्याण निरीक्षक प्रियंका जाधव उपस्थित होत्या.


या कार्यशाळेमध्ये शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यामधील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम उद्दिष्टे व नियोजन,आंतरवासिता उपक्रम, शिक्षण संचालनालया कडील एनएसपी पोर्टल वरील एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती योजना , राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना,अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी,आदिवासी विकास योजनेअंतर्गत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, समाज कल्याण शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती, बार्टी, महाज्योती व स्काऊट गाईड याबाबत  मार्गदर्शन करण्यात आले.

       कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलचे मुख्याध्यापक श्रीमंत काळे, बाळासाहेब कोकरे, शेवगाव येथील समूह साधन केंद्र  विषय तज्ञ आदींनी परिश्रम घेतले. प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी तर सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ यांनी केले. तर शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांनी आभार मानले.