पतीने पत्नीच्या गळ्यावर वार करीत स्व:ताही जखमी

कोपरगाव प्रतिनिधी दि.१३ : पत्नी सासरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन पत्नीच्या गळ्यावर वार करीत स्वतःलाही जखमी करुन दोघांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या पतीला पोलीसांनी गजाआड केले आहे. 

पत्नी सासरच्या घरी येण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत धुंद असलेल्या पतीने कुरापत काढून चक्क पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर पतीने आपल्या गळ्यावर देखील वार करून स्वतःला जखमी करून घेतल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील चासनळी येथे घडली.  सुभाष हिरामण सोनवणे रा. सोयगाव,ता. नांदगाव जिल्हा नाशिक या पती विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ११ जुलै रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

याबाबत जखमी पत्नीचे मामा अण्णा वामन बर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक माहिती अशी की, सुभाष हिरामण सोनवणे व त्यांची पत्नी संगीता सुभाष सोनवणे (वय 22 )हे पती -पत्नी नऊ जुलै रोजी चासनळी येथे लग्न निमित्त आले होते. लग्न झाल्यानंतर पती सुभाष  पुन्हा घरी निघून गेले. मात्र त्यांची पत्नी चासनळी  येथील मामांकडे मुक्कामास राहिली. त्यानंतर दिनांक ११ जुलै रोजी पती सुभाष सोनवणे आपल्या पत्नीला पुन्हा सासरी घेऊन जाण्यासाठी आले. मात्र पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यातून त्यांचे भांडण झाले.

ते भांडण इतके विकोपाला गेली ही पती सुभाष सोनवणे याने पत्नी संगीताच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर सुभाष यांनी स्वतःच्या गळ्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी करून घेतले. कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये सुभाष हिरामण सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 बहीणीच्या मुली बरोबर लग्न करणारा पती तर दुसऱ्या बाजूने मामा असणारा नराधम भाचीचा गळा घोटणारा विक्षिप्त पती झाला होता आणि त्यानेच जीवघेणे वार करुन गंभिर जखमी केले.