बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतल्यास पुढची पिढी सक्षम होईल – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार व्हायचे असेल तर त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आणि आचरणात आणायला हवेत आजची युवा पिढी जर या विचारांची वारसदार झाली तरच पुढील पिढी सक्षम होईल व भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. 

दि. १४ एप्रिल रोजी जेऊर कुंभारी( संजयनगर) येथे भीमसम्राज्य सेनेच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अनुयायी म्हणून काम करत आहेत.

भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून जन्मभूमी,चैत्यभूमी, दीक्षाभूमी, शिक्षणभूमी,दिल्ली नॅशनल मेमोरियल आदी पंचतीर्थ विकासासाठी विशेष काम सुरू आहे. मागील राज्य सरकारच्या काळात सौ.स्नेहलताताई कोल्हे आमदार असताना व विनोद तावडे मंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या मदतीने इंग्लंडमध्ये सन. १९२१-२२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूत वास्तव्यास होते ती वास्तू राज्य सरकारने विकत घेऊन तेथे स्मारक बनवण्याचे काम केल्याने प्रेरणादायी ठेवा जतन करण्याने पुढील पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रथम विवेक कोल्हे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या उपास्थितीत धम्मध्वजा चे ध्वजारोहन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे होते तर स्वागताध्यक्ष आर पी आय चे प्रदेश सचिव दिपक गायकवाड होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन भिम सम्राज्याचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांनी केले.

यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिष आव्हाड, उद्योजक मिलनकुमार चव्हाण, अशोक रोहमारे ,माजी पंचायत समिती सभापती शिवजी वक्ते, माजी संचालक मधुकर वक्ते, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच ताराचंद लकारे,कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामराव ढिकले,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरे, उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,तसेच कोपरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष आकाश नागरे, जेऊर कुंभारी सोसायटी चे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, जनार्दन स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदा चव्हाण, सहाय्यक निबंधक ठोंबळ , माजी सरपंच रमेश वक्ते,  

स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गुरसळ भास्करराव वाकोडे, संजय भालेराव, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, आप्पासाहेब वक्ते, कोंडीराम वक्ते, कल्याण गुरसळ, महेंद्र वक्ते, किशोर वक्ते माजी उपसरपंच यशवंतराव आव्हाड,मधुकर वक्ते,  समिर गिरमे ,संजय वक्ते, संजय भोंगळे, जालिंदर चव्हाण, नामदेव वक्ते, किरण गायकवाड, किशोर गायकवाड, गंगुबाई जाधव, रायभान खंडीझोड, ग्रामसेवक केबी रणछोड, भानुदास वक्ते, सागर गुरसळ, कैलास चव्हाण, नानासाहेब गुरसळ,अजय सुपेकर,

राणा वक्ते, पत्रकार किसन पवार, संजय भारती, सागर गायकवाड, कार्याध्यक्ष सुमित पगारे, उपाध्यक्ष दावीद धीवर, नियोजन समिती अध्यक्ष प्रविण गायकवाड, स्वप्निल भालेराव, भारत गायकवाड, अमोल जगताप आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रदर्शन आर पी आय प्रदेश सचिव दिपक गायकवाड यांनी केले.