काळे परिवारावर सदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे आशिर्वाद कायम – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांची सेवा करण्याचे भाग्य नेहमी काळे परिवाराला मिळाले आहे. या सेवेचा वारसा पुढे चालवितांना मला देखील सेवा करण्याची संधी मिळत आहे हे माझे परमभाग्य असून काळे परिवाराला नेहमीच सदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचे आशिर्वाद मिळाले असून यापुढेही हे आशीर्वाद कायम राहतील असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Mypage

राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे दि.२८ नोव्हेंबर ५ डिसेंबर या कालावधीत भव्य जपानुष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या जपानुष्ठान सोहळ्याच्या सांगता समारंभ प्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित संत महात्म्यांचे पूजन करून त्यांचे आशिर्वाद घेतले यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.

Mypage

यावेळी ते म्हणाले की, नामजप केल्यामुळे मनावरील दुष्ट विचारांचा प्रभाव नाहीसा होवून दु:खाचा नायनाट होतो. परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी नामजप परमेश्वराच्या भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे हा जपानुष्ठान सोहळा होवू शकला नाही त्यामुळे असंख्य भक्तांना जपानुष्ठान सोहळ्याला मुकावे लागले. संत महात्म्यांच्या आशीर्वादामुळे हे संकट संपुष्टात आले असून संत महात्म्यांचे आशिर्वाद नेहमीच भक्तांच्या पाठीशी राहतील असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *