कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित संघ या क्रीडा महोत्सवात सहभागी झाल्याने जिल्हास्तरीय असलेल्या क्रीडा महोत्सवाला राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख, सर्व शिक्षक वृंद तसेच राज्यातून आलेले विविध संघ त्यांचे व्यवस्थापक, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात फुटबॉल, हॉकी तसेच हॉलीबॉल मुली असे एकूण ३० संघ सहभागी झाले आहेत.
हॉलीबॉल मुली स्पर्धेचा प्रारंभ सौ.रईसा शेख यांच्या हस्ते, हॉकी स्पर्धा प्रारंभ शिक्षकांच्या हस्ते तसेच फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ महिला शिक्षकांच्या हस्ते प्राचार्य नूर शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार काळे म्हणाले की, ज्याप्रमाणे गौतम पब्लिक स्कूलचे खेळाडू क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व राखत आहेत त्याप्रमाणे इतर विद्यालयातील खेळाडूंनी देखील विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवावे यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा स्तुत्य उपक्रम आहे.
एकीकडे मोबाईलशी जोडलेले विद्यार्थी मैदानावर येत नाहीत. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय असलेली स्पर्धा राज्यस्तरीय झाल्यामुळे अशा स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा मैदानी खेळावरील ओढा निश्चीतपणे वाढणार असल्याचे सांगितले. सर्व सहभागी खेळाडू, संघ व्यस्थापक, प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून त्यांना उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर तसेच राज्य हॉकी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर अजीज सय्यद यांनी महोत्सवास भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते उद्या ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असल्याची माहिती शाळेची प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, हॉलीबॉल प्रशिक्षक अजीज सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स, शिक्षक वृंद, एनसीसी, स्काऊट आपली जबाबदारी पार पाडत आहे.