कोपरगावमध्ये दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर गोळीबार 

गोळीबारात एकजन गंभिर जखमी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : शहरातील स्वामी समर्थ जवळील मुख्य रस्त्यावर अज्ञात चार ते पाच जनांनी तन्वीर रंगरेज याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करुन गंभिर जखमी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण कोपरगाव हादरले आहे. 

गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर स्वामीसमर्थ मंदीराजवळ मुख्य रस्त्यावरून तन्वीर हमीफ ( बालम)  रंगरेज वय ३८ वर्षे हा आपली गाडी नं. एम एच ४२ के १४६१ या चारचाकीतुन शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव शहरातील काही तरुण दुचाकीवरुन आले आणि रंगरेज यांच्यावर अंधाधुंद फायरिंग सुरु केली. दोन पिस्तुलातुन रंगरेज याच्या दिशेने गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी छातीला तर एक गोळी कमरेला लागल्याने रंगरेज रक्ताच्या थारोळ्यात पडला.

गोळी झाडणाऱ्या तरुणांनी रंगरेज याच्या गाडीवर दगडफेक  करून गाडीच्या काचा फोडल्या. गोळीबार थरार सुरु असताना जवळच असलेल्या महाविद्यालयातील युवक युवती मुख्य रस्त्यावरुन जात असताना हा थरार पाहुन भयभीत झाले. तर त्या परिसरातील दुकानदारासह मुख्य रस्त्यावर नागरीकांची पळापळ सुरु झाली. घटनेची माहीती पोलीसांना कळतात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी फायरिंग केले पिस्तूल मधील पाच जीवंत काडतुसे पडलेली होती रक्ताचे डाग व फोडलेली चारचाकी गाडी घटनास्थळी होती.

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार तन्वीर हमीफ (बालम) रंगरेज हा गंभीर जखमी असल्याने त्यावर उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले असल्याचे सांगितले. तर गोळीबार करणारे अज्ञात चार ते पाच व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले. पोलीसांनी गोळीबार प्रकरणातील तिघा संशयीताना ताब्यात घेतले आहे. गोळीबार प्रकरणी एका अल्पवयीन मुलाचाही  सामावेश असुन पोलीस पुढील तपास करुन गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेवून राञी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

दरम्यान हा गोळीबार अवैध व्यवसायातील पुर्व वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. गोळीबार करणारे हे शहरातील बस स्थानक व खुले नाट्यगृह येथे चक्री नावाचा जुगार चालवत असल्याची चर्चा आहे. या पुर्वीची दोन वेळा यांच्यामध्ये वादविवाद झाले होते. तेव्हाही गावठी कट्ट्याचा धाक दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या कोपरगाव शहरात अवैध व्यवसायातून गटात गटात वाद वाढत चालले आहेत अशी नागरीकांमध्ये चर्चा जोरदार सुरु आहे. 

 दरम्यान घटनेची माहीती कळताच पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून योग्य त्या सुचना पोलीस प्रशासनाला देत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 ९ सप्टेंबर रोजी तन्वीर रंगरेज व त्याचे साथीदार यांनी गोळीबार करणाऱ्यांना दमदाटी करून पिस्तुलाचा धाक दाखवला होता. त्याची पोलीसात तक्रार होती, पण पोलीसांनी या प्रकरणाकडे थोडा कानाडोळा केला. आज रंगरेज याच्याविरूध  तक्रार करणाऱ्यांपैकी काहींनी गोळीबार करुन रंगरेजचा बदला घेतला.  यावरुन दोन्ही गटातील अवैध व्यवसायातील वाद उघड झाला. अवैध राशन दुकानातील धान्य विक्री व चक्री जुगार तसेच अनैतीक संबधातील वादाचे पडसाद या गोळाबारातून चर्चेला येत आहेत. याची संपूर्ण शहानिशा पोलीस करीत आहेत. 

Leave a Reply